राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सरकारला परत करणार पुरस्कार
शिक्षण क्षेत्रातले वातावरण भयभीत
राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सरकारला परत करणार पुरस्कार
शिक्षण क्षेत्रातले वातावरण भयभीत
प्रहार संघटनेचा इशारा
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर : (दि २८) प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली सरकारने काही शाळा बंद केल्या. त्यामध्ये शिक्षक भयावह झाले व शिक्षण बंद झाले तर शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहील. त्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेने पुढाकार घेतला व सरकारला इशारा दिला की, शिक्षकांच्या सुरक्षेतेसाठी व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी शिक्षण क्षेत्रात प्रहार शिक्षक संघटना काम करीत आहे.
शिक्षण क्षेत्रात भयमुक्त व चांगले वातावरण निर्माण झाले पाहिजे. यासाठी प्रहार शिक्षक संघटना कटिबद्ध आहे. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार परत करण्याचा इशारा शासनाला देण्याचा निर्णय प्रहार शिक्षक संघटनेने घेतलेला आहे. शिक्षण क्षेत्रात प्रचंड समस्या निर्माण झाल्यात, शिक्षक हतबल झालेले आहेत, आंदोलन करून देखील दखल घेतल्या जात नाही. शेवटी वैतागून आजपर्यंत ज्यांना ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहे ते सर्व पुरस्कार प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वात लवकरच शिक्षण मंत्राकडे सुपूर्द करण्यात येईल.
प्रहार शिक्षक संघटना नागपूर जिल्ह्याच्या वतीने पत्रपरिषद घेण्यात आली त्यावेळी नागपूर विभागाचे प्रमुख अजय भोयर यांनी प्रहार शिक्षक संघटने तर्फे इशारा दिला. यावेळी पत्रपरिषदेत प्रहार शिक्षक संघटनेचे नागपूर विभाग अध्यक्ष अजय भोयर, गजानन कुरवाडे, राजकुमार तिरभाने, धनराज कावटे, नागपूर जिल्हाध्यक्ष योगराज ढेंगे, जिल्हा सचिव पृथ्वीसिंग चव्हाण आणि विजय काळे सह उपस्थित होते.



