Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताखानदेशदेश-विदेशसाहित्यगंध

कुठे शोधू तुला

संध्या मनोज पाटील अंकलेश्वर गुजरात

0 5 1 6 4 1

कुठे शोधू तुला

कुठे शोधू तुला, कणाकणात तू//
अंतर्मनात तू ,सामावला//

भुकेल्या गरिबा, घास दोन देता//
आशीर्वाद घेता, मिळे शांती//

अनाथ आश्रमी, भेट देता कधी//
रूप तुझे आधी, दिसे मला//

पानाफुलातही, वास तुझा देवा//
सृष्टीचा हा ठेवा, कृपा तुझी//

नको जाणे मला, यात्रा चारधाम//
जनसेवा काम, सुख देई//

कुठे शोधू तुला, कशास म्हणावे//
आत्माराम भावे, ईश माझा//

अंतर्मुखी होता, दर्शन मिळते
शाश्वत कळते, हेचि ध्येय //

नको भटकणे, मोहाचे सुटणे//
आनंद लुटणे, संध्या म्हणे//

संध्या मनोज पाटील
अंकलेश्वर गुजरात

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 4 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे