Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 0 9 0 3

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*

*☄विषय : ग्रंथमैत्री☄*
*🍂शनिवार : ०४/ १० /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*ग्रंथमैत्री*

ग्रंथ हेच खरे गुरू, जीवनात करावी ग्रंथमैत्री
पार होईल भवसागर, याची निःसंशय खात्री..//

घेऊन पहावा एकदा, या ग्रंथांकडून कानमंत्र
कधी दिशाहीन झाल्यास, हे ठरेल होकायंत्र..//

वादळात सापडे नौका, शिकवी खलाशी तंत्र
सुखरूप नेई पैलतीरास, होवून विश्वासू मित्र..//

ज्ञानाचा अक्षय खजिना, शंका नसावी मात्र
व्यासंग यांचा लागताच, व्हाल विद्वत्ता पात्र..//

अखंड ध्यास अभ्यास, करत रहावे अहोरात्र
राजहंस वृत्तीने वागावे, बनूनी जिज्ञासू छात्र..//

आत्मबोध करून देणारे,हे असे महान शास्त्र
मग दिव्यदृष्टी प्राप्तीने, बनतील तेजस्वी नेत्र..//

असा प्रकांड पंडित विद्वान, पूजनीय सर्वत्र
असे धन्य ते ग्रंथ निर्माता, धन्य त्यांचे चरित्र..//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री*

जीवनात प्रत्येकानेच,
ग्रंथमैत्री करावी…,
स्वतःच्या विकासाची,
सोपी वाट धरावी…!

ग्रंथ शिकवतात,
जीवन तत्त्वज्ञान…,
तत्वज्ञानातून मिळते,
जगण्या आत्मज्ञान…!

ग्रंथासारखा मित्र,
जगात नाही मिळणार…,
ग्रंथांच्या सानिध्यातच,
हे सत्य कळणार…!

जीवनातील प्रत्येक,
प्रश्नाचं उत्तर…,
मिळते ग्रंथात अन्,
अडचणी होतात निरूत्तर…!

ग्रंथमैत्री बाबासाहेबांनी,
केली त्यांच्या जीवनात…,
उद्धरली लाखो कुळे अन्,
चेतवली ज्ञानज्योत मना-मनात…!

चेतवली ज्ञानज्योत मना-मनात…!

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*©️ सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री*

ग्रंथ म्हणजे
ज्ञानाचा खजिना
उद्देशहीन असते
जगणे ग्रंथाविना

ग्रंथ दाखवतात
दिशा जीवनाची
कला लपली असते
त्यात जगण्याची

ग्रंथमैत्री करुन
लुटावे ज्ञानाचे भांडार
वाटणार नाही
जगण्याचा भार

ग्रंथ असतात गुरू
देतात सुविचारांची साथ
खचलेल्या मनाला
देतात मदतीचा हात

ग्रंथ असतो
मानवाचा खरा मित्र
वेळोवेळी उलगडून दाखवितो
जीवनाचे नवे चित्र

*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री*

ग्रंथ हाच गुरू
ग्रंथमैत्री करू
ग्रंथ जीवनात
जणू कल्पतरू

ग्रंथ देई ज्ञान
घडवी विद्वान
ग्रंथाविना घर
जणू स्मशान

मनाचे पावित्र्य
ग्रंथातून घडे
ग्रंथ म्हणजेच,
जणू सात्विकमळे

दावी सत्याची वाट
ग्रंथ पुण्याचा पाठ
विवेकी विचाराचा
जणू,भरलेला माठ

भरी जगण्यात आशा
करी अंत निराशेचा
ग्रंथ मनू जातीची
जणू विन्रम वाचा

संस्काराची शाळा
तर्कशुद्धतेचा धडा
ग्रंथ मनु जीवनात
जणू सुविचारीफळा

चला करू ग्रंथमैत्री
जगी मिळवू किर्ती
सुजलाम सुफलाम्
घडवू ही धरती

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*ग्रंथमैत्री..*

ग्रंथमैत्रीची संकल्पना
सर्वत्र सारेच पसरूया
वाचन ते वाचक प्रवास
आनंदे आत्मसात करूया..

ज्ञानदीप उजळवी मनी
संस्कारांचा ठेवा लाभे
ग्रंथसखा बनुनी जीवनात
प्रेरणा देण्या सदैव उभे..

ग्रंथ आपली जुनी ठेव
ग्रंथालयाची उभारणी
ग्रंथमैत्रीची फुले पालवी
मनामनात करू पेरणी..

लहानथोर येऊ एकजुटीने
ज्ञानाची अखंड वाहे गंगा
ग्रंथ संगतीचा घेऊन लाभ
कानोकानी आवश्य सांगा..

जरी काळ, पिढीही बदलली
नव्या सुविधानीं गती मिळवली
तरुणपिढी विळख्यात अडकली
ग्रंथमैत्रीने नवी दिशा वळवली..

जुने नवे कितीक ग्रंथ भांडार
जपून ठेवावी परंपरा आपली
भाषेची होईल नक्कीच वृद्धी
कितीक शब्दफुलांनी व्यापली…

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री*

असावी सदा ग्रंथमैत्री
ग्रंथ ज्ञानाचे भांडार
वाचता मिळे ज्ञान
होई जीवनाचा उद्धार

ग्रंथ म्हणजे गुरू
जीवनाचे दिशादर्शक
देई विचारांना आकार
होई जीवन सार्थक

वाचता संत चरित्र
मिळे सत्धर्माची शिकवण
जीवना करी पवित्र
लाभे शांती तत्क्षण

विवीध क्षेत्रांचे साहित्य
देई अद्भूत अनमोल ज्ञान
मानवी,भौतिक,आध्यात्मिक
उन्नतीचे मिळे सखोल ज्ञान

वाचनाचा छंद मनाला
देतो अपूर्व समाधान
घडविती ग्रंथ जीवन
जीवनी त्यांचे अमूल्य स्थान

*श्रीमती सुलोचना लडवे*
*अमरावती*
*©सदस्या,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री*

पुस्तकाच्या जगात
रममाण व्हावे
ज्ञानार्जनासाठी एकेक
पुस्तक वाचावे

वाचन समृद्धीसाठी
ग्रंथमैत्री करावी
पुस्तकाच्या माध्यमातून
ज्ञानाची कास धरावी

वाचनाने विचारांना
चालना मिळते
नवनवीन कल्पनांनी
मन भरारी घेते

ग्रंथमैत्रीने ज्ञानाचे
गवाक्ष उघडते
आयुष्यात जगण्याचं
सामर्थ्य मिळते

जीवनातील मार्गदर्शक
ग्रंथ हे ज्ञानाचे भांडार
ज्ञानात भर घालून
माणसाला देई आधार

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री*

ग्रंथ महान गुरु आपले
देती नवीन नवीन ज्ञान
ज्ञानामुळे मिळतो येथे
अख्या विश्वात सन्मान…!!

शब्दाशब्दांत दडलेली
जग जिंकण्याची शक्ती
धार्मिक ग्रंथ वाचल्याने
जागृत होते ईश्वर भक्ती…!!

नित्य ग्रंथ वाचन करून
विचार शक्ती वाढते फार
नकारात्मकता नष्ट होऊन
सकारात्मक होतो विस्तार…!!

उतारवयात एकाकीपणा
ग्रंथासोबत घालवावा वेळ
नाही वाटत निरस जीवन
मिळे नित्य आनंद निर्भेळ…!!

ग्रंथमैत्री सावलीसम देईल
संकट दुःख संघर्षात साथ
अंधारातून प्रकाश दाखवी
स्वप्नपूर्ती नक्की जीवनात…!!

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री*

*सुसंस्कृत संस्काराचे, हृदय नसोत खाली…*
*प्राशन करणे लागे, ज्ञान अमृताची प्याली…धृ*

प्रित ऐसी जडू द्यावी,असो ग्रंथ माझे घर…
ग्रंथ पानी जीवनाचा,पसरे गंध चौफेर…
*अन्यायाला जाळावया,पेटवा ज्ञान मशाली…१*
*प्राशन करणे लागे, ज्ञान अमृताची प्याली…*

ग्रंथ देती शिकवण ,जगण्याचा महामंत्र…
कुणी नसे सान थोर,सारे समान संयंत्र…
*समृद्धीच्या वाटेवर,भरा ज्ञानाच्या पखाली…२*
*प्राशन करणे लागे, ज्ञान अमृताची प्याली…*

उपलब्ध ज्ञानकक्षा, विविध साधनामाजी…
ग्रंथ शिकवून जाई,शब्दें हजरजबाबी…
*विश्व सुखाची धारणा,शिकवी ग्रंथ प्रणाली…३*
*प्राशन करणे लागे, ज्ञान अमृताची प्याली…*

ग्रंथ हा जीवन सार, जैसे विशाल आकाश…
*सुधाकरा* ज्ञानज्योत, देई ज्ञानाचा प्रकाश…
*”ग्रंथप्रेमी” बनू चला,गाऊ ग्रंथाची कव्वाली…४*
*प्राशन करणे लागे, ज्ञान अमृताची प्याली…*

*सुधाकर भगवानजी भुरके, आर्य नगर, नागपूर*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री : -*

ग्रंथप्रेमी करी ग्रंथमैत्री
अभ्यासू चिकीत्सक
झाले कवी कवियत्री
सर्वोत्कृष्ट लेखनिक ||

वाचनालयी जातो दररोजी
ग्रंथ पुस्तके वाचतो नवेनवे
वाचनाशी नाळ जुळवली
साक्ष देती ज्ञानाची पुरावे ||

ग्रामगीता युगग्रंथ
आयुष्याची संजिवनी
वाचता ओवी आचरण मनी
बदलवी समूळ जिवनी ||

दर्जेदार साहित्यकृती
भर पडी ज्ञानी होई मती
अज्ञानाची दशा संपवी
जिज्ञासू वृत्ती साधशी प्रगती ||

अब्राहम लिंकनचे वाचनवेड
बाबासाहेबांना वाचनाची आवड
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे
ज्ञानबिजांकुरातुन उगवले झाड ||

जगद्गुरु तुकोबांची अभंगगाथा
माउली ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी
संताचे वाङ्ममय वाचनिय
भावार्थ दिपिका जनहितकारी ||

*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️
*ग्रंथमैत्री*

ग्रंथमैत्री केली मी
बुध्द आणि धम्म ग्रंथाची
गोडी लागली मजला
बुध्द आणि धम्माची

तथागत बुद्धा चरणी
नतमस्तक मी होतो
रोज सकाळी सकाळी
बुध्दाला शरण जातो

जीवनाचे सार आहे
सांगितले धम्म ग्रंथांत
आचरण शुध्द ठेवावं
माणसाने वागण्यात

प्रज्ञा,शील,करुणेचा
दया क्षमा, शांतीचा
मार्गदर्शक ठरला ग्रंथ
कल्याणकारी मानवाचा

विज्ञाननिष्ठ धम्म असे
नाही अंधश्रद्धेला थारा
विषमतेला तिलांजली देतो
समतेचा गुंजतो नारा

विश्वकल्याणाचे सार
सामावले आहे ग्रंथात
रुजावा मानवता हाच धम्म
प्रत्येकाच्या मनमंदिरात

*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️📗✍️📗♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖

*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏

➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे