Breaking
नागपूरब्रेकिंगमहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

चामुंडी दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

0 1 8 2 9 9

चामुंडी दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई दि.14:- औद्योगिक सुरक्षेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे कुठे ? हा प्रश्न चामुंडी दुर्घटनेमुळे निर्माण होत आहे. गेल्यावर्षी देखील नागपूर येथील कंपनीत स्फोट होवून झालेल्या दुर्घटनेत निष्पाप कामगारांचा जीव गेला होता. डोंबिवली MIDC मधून दर आठवड्याला स्फोट होवून अपघात होण्याच्या बातम्या येत आहे.

सतत या घटना घडत असताना सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. सतत होणारे हे अपघात मानवी चूक नसून पूर्णपणे सरकार आणि प्रशासन यामध्ये दोषी असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्याचबरोबर चामुंडी दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, शासनाची तसेच संबंधित कंपनी व्यवस्थापनाची मदत तात्काळ देण्यात यावी, अशी मागणी देखील श्री. वडेट्टीवार यांनी केली आहे.

नागपूर जवळील धामणा येथील स्फोटके बनवणाऱ्या चामुंडी कंपनीत झालेल्या दुर्घटना स्थळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज भेट दिली. या भेटीनंतर श्री. वडेट्टीवार बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते सुनील केदार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख आणि रामटेकचे खासदार श्यमकुमार बर्वे उपस्थित होते.

श्री. वडेट्टीवार म्हणाले की, अकुशल कामगारांच्या हाती ५०० किलो स्फोटके देणे, काम सुरू असताना वरिष्ठ उपस्थित नसणे, स्फोटक असलेल्या ठिकाणी विशेष काळजी घेतली न जाणे, सुरक्षा पोशाख, सेफ्टी शूज अशी सुरक्षा साधने कामगारांना उपलब्ध न करून देता त्यांना काम करायला लावणे या बेजबाबदारपणाला कंपनी व्यवस्थापनासोबतच सरकारची प्रशासकीय व्यवस्था सुद्धा जबाबदार आहे. स्फोट झाल्यानंतर जखमींना तात्काळ मदत मिळणे आवश्यक असताना दीड तासाने रुग्णवाहिका मदतीला पोहचते हा अक्षम्य बेजबाबदारपणा आहे. यामुळे निष्पाप कामगारांचा जीव गेला आहे.

कंपनीच्या व्यवस्थापनाकडे फक्त जाब मागून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सरकारने आणि प्रशासकीय यंत्रणेने यावेळी करू नये. राज्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय कुठे झोपी गेले याचे उत्तर सरकारने द्यावे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 1 8 2 9 9

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे