‘वाघाची मावशी’ बाल काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न
'वाघाची मावशी' बाल गोपालांसाठी एक साहित्य क्षेत्रातील पर्वणी; मा. सुरेशजी नवले
‘वाघाची मावशी’ बाल काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न
‘वाघाची मावशी’ बाल गोपालांसाठी एक साहित्य क्षेत्रातील पर्वणी; मा. सुरेशजी नवले
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड :- (दि १२): बीड शहरातील नामांकित द. बा. घुमरे पब्लिक स्कूल मध्ये आज दि १२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध कवयत्री शर्मिला घुमरे देशमुख यांचे बाल कविता संग्रह ‘वाघाची मावशी’चे प्रकाशन माजी मंत्री सुरेश नवले, सी ए भानुदास जाधव, सुदाम शिंदे मराठवाडा शिक्षक संघ संस्थापक सदस्य ,सुभाष पवळ समर्थ शिक्षण संस्था सचिव,ज्येष्ठ कवी भारत सातपुते, मराठीचे शिलेदार समूहाचे संस्थापक राहुल पाटील,विलास बडगे बापू,संग्राम कुमठेकर, उत्तमराव पवार सरचिटणीस शिक्षण संस्था संघ बीड,मोहन शिरसाठ चक्रधार शिक्षण संस्था,गणेश वाघ शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळ, यांच्या सह शिक्षण संस्था महामंडळं जिल्हा अध्यक्ष दिपक घुमरे, राष्ट्रीय खेळाडू दगडू चव्हाण, दै सूर्योदय संपादक कळकुटे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमाचे आयोजन द बा घुमरे शैक्षणिक संकुल बीड येथे आयोजन करण्यात आले होते सदरील पुस्तकाचे मुखपृष्ठ सजावट राजनंदिनी घुमरे , छपाई मराठीचे शिलेदार संस्थेच्या वतीने केली होती. या प्रसंगी प्रा सुरेश नवले साहेब म्हणाले कि, या पुस्तकामुळे बाल गोपालांसाठी एक उत्तम लेखन झाले असून ही एक साहित्य क्षेत्रातील पर्वणी आहे.
या प्रसंगी शाळेतील विद्यार्थी यांनी शिष्यवृती परीक्षेत यश मिळवल्या बद्दल गुण गौरव करण्यात आला, तसेच स्व द बा घुमरे तात्या यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सपन्न झाला या प्रसंगी पालक विध्यार्थी बहुसंख्येने हजार होते. कार्यक्रमाचे सूत्र संचलन मुख्याध्यापक एम आर शेंडगे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी, संभाजी पवार, अतुल इंगोले, देवढे व्ही डी , अडागळे जी के मॅडम, जयश्री कवळे, बी एन गव्हाणे, अजय गव्हाणे, श्रीमती खोड एम एस मॅडम, श्रीमती पवार, सोंडगे, सोनवणे व्ही बी, अशोक सानप, जगताप अनिल, चव्हाण पी के , मोटे एम ए , जाधव व्ही एस , शिंगटे ए बी , हावळे पी बी , काकडे ए बी सोनवणे जे एस ,सोंडगे रोहिणी याच्या सह शिक्षक वृंद संस्था पदाधिकारी यांनी प्रयत्न केले.