“कृतज्ञतेने झुकलेली चिंब पापणी वंदिते शिलेदार परिवाराला”; राजश्री ढाकणे

“कृतज्ञतेने झुकलेली चिंब पापणी वंदिते शिलेदार परिवाराला”; राजश्री ढाकणे
हृदयाला वेदनांचा भार
पापणी सहाय्यक फार
आसवांचा सुरु मुसळधार
जवळपास दोन महिने थांबलेल्या लेखणीला त्रिवेणी काव्य स्पर्धेत सर्वोत्कृष्टतेचा सन्मान आहेर देऊन गौरविले आणि हृदयात दाटलेला कृतज्ञभाव अगदी आनंदाने उचंबळून आला जेव्हा प्रथमत: वृंदाताईचे परीक्षण वाचले… अगदी पापणी न लवता वाचले… अनेक भावभावनांचा संगम होऊन पापणीजवळ आला आणि पापणीने त्यांना अडवले नाही…!
काल दिनांक २६/०५/२०२५ रोजी सहजच त्रिवेणी काव्य समूहात डोकावले आणि विषय वाचला ” पापणी ” ८. ५२ मिनिट झाले होते पण विषयाने हृदयाचा तळ गाठला आणि क्षणात त्रिवेणीचा जन्म झाला…!…स्पर्धा संपायला १ मिनिट राहिला होता… त्रिवेणी स्पर्धेत उतरली आणि परीक्षकांच्या कसोटीत अव्वल ठरली..!… निकाल पाहताच पापणी आनंदात चिंब चिंब भिजली आणि गुणगुणली…
“आज आनंदाचा दिनू
मन लागे गुणगुणू…!”
खरंच यापेक्षा मोठा आनंदाचा दिन किंवा क्षण दुसरा कोणताही असू शकत नाही असं मला वाटतं… त्रिवेणी काव्य स्पर्धेच्या मुख्य परिक्षक प्रिय वृंदाताई आणि निवड समितीचे ऋणयुक्त धन्यवाद…!
एवढ्या पटकन त्रिवेणी काव्य सुचण्याचं कारण म्हणजे याच महिन्याच्या ५ तारखेला आमच्या लाडक्या लेकीचा शुभविवाह झाला. शुभ मंगल प्रसंगी ज्यांच्या विरह वेदना हृदयात दाटून आल्या असे माझे आईवडील आणि माझा काळजाचा तुकडा माझा मुलगा श्रीकृष्ण…!… आनंद, दुःख, विरह वेदना या सर्वांचा जेव्हा हृदयाला भार झाला तेव्हा “पापणी” झाली सहाय्यक फार आणि बहिणीच्या मिठीत आसवांचा सुरु झाला मुसळधार…!..हा सर्व प्रसंग क्षणात धावला आणि कालची ” पापणी ” त्रिवेणी म्हणजे दुःख आणि विरह वेदनांचा संगम होऊन अश्रुंचा मुसळधार पाऊस पडू लागला…! भावभावनांचे मिश्रणाने तयार झालेली त्रिवेणी अव्वल ठरली धन्यवाद शिलेदार परिवाराचे…! त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्व सहभागी आणि सहविजेत्या आदरणीय सन्माननीय दादा /ताईंचे मनःपूर्वक खूप खूप अभिनंदन…!
पाडव्याच्या शुभदिनी सुपारी फुटली आणि विवाहतिथी निश्चित झाली… लगीनघाई सुरु झाली… एक दोन दिवस आधीच आदरणीय राहुलदादांना काव्यसंग्रह प्रकाशित करण्याची इच्छा आहे पण आता उशीर झाला खूप त्यामुळे होईल का पूर्ण असा मेसेज दादांना केला आणि दादांनी होकार दिला… पण त्यानंतर लगेच आमच्या दिदीची सुपारी फुटली… दादांचा मेसेज आला कविता पाठवा… मग मी सविताला बोलले की, कविता पाठवते पण सर्व काही तुम्हाला पूर्ण करावं लागेल मला आता वेळच नाही. राहुलदादा आणि सविता दोघांच्या मेहनतीने, सहकार्याने आणि सर्वांच्या शुभेच्छाने “हुंदका ” काव्यसंग्रह पूर्ण झाला आपले ऋण न फिटणारे आहे.. कृतज्ञभाव आजन्म राहील… शब्द तोकडे पडत आहेत आपल्या मेहनतीपुढे …त्रिवार मानाचा मुजरा…! पण इच्छा असूनही लग्नकार्यामुळे प्रकाशन सोहळ्यास व अभूतपूर्व काव्यसंमेलनास उपस्थित राहता आले नाही याची खंत सदैव राहील…!..
माझ्या “हुंदका” काव्यसंग्रहाचे प्रकाशक तथा शिलेदार परिवाराचे मुख्य संस्थापक अध्यक्ष/ प्रशासक /संपादक /ध्येयवेडे अष्टपैलू व्यक्तिमत्व /देवांश आदरणीय राहुलदादा पाटील,दादांच्या अर्धांगिनी तथा संस्थेच्या सचिव सौ.पल्लवीताई पाटील उभयतांचे ऋणयुक्त धन्यवाद…”हुंदका” काव्यसंग्रह ज्या प्रस्तावनेने नटला आहे त्या प्रस्तावनेच्या प्रगल्भ प्रतिभावंत कवयित्री/लेखिका/ अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे माझी प्रिय सखी सविता मराठीचे शिलेदार समुहाच्या मुख्य प्रशासक/परीक्षक,कार्यकारी संपादक/जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा यांचे ऋणयुक्त धन्यवाद… गोडीने आणि जोडीने उपस्थित राहून अमूल्य वेळ खर्चून शुभेच्छा संदेश देणारे आधुनिक ज्योतिबा /विज्ञानाशी मैत्री असणारे म्हणजे आपले प्रशांत भाऊ ठाकरे ज्यांच्या अमूल्य शुभेच्छा लाभल्या ऋणयुक्त धन्यवाद भाऊ…”हुंदका” आवरण्यास धावून येणाऱ्या/ वात्सल्यसागर म्हणजे सर्वांच्या आईसाहेब आदरणीय स्वातीताई यांच्या आशीर्वाद रुपी शुभेच्छा लाभल्या खरंच भाग्यवान मी…!.. माझी प्रिय सखी चित्रचारोळी परीक्षक प्रतिभावंत कवयित्री सौ. स्वाती मराडे /आटोळे, बालकाव्य परीक्षक प्रिय सखी सौ. शर्मिलाताई देशमुख आपल्या सर्वांच्या शुभेच्छा लाभूनच “हुंदका” काव्यसंग्रह पूर्णत्वास गेला आपले सर्वांचे कृतज्ञतापूर्वक ऋणयुक्त धन्यवाद… आभार… प्रिय/आदरणीय वृंदाताई, तारकाताई, प्रतिमाताई, अनिताताई, पद्माताई, वसुधाताई, आदरणीय विष्णुदादा, संग्राम दादा, अरविंद दादा, अशोक दादा, भुरके दादा आणि संपूर्ण शिलेदार परिवारातील दादा ताईंचे मनःपूर्वक ऋणयुक्त धन्यवाद…!!
राजश्री मिसाळ ढाकणे बीड
शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा
सदस्या – मराठीचे शिलेदार समूह