प्रतापगडाच्या मार्गावर रेडियम रिफ्लेक्टर पोलची संख्या वाढवावी
वसुधा नाईक प्रतिनिधी पुणे
प्रतापगडाच्या मार्गावर रेडियम रिफ्लेक्टर पोलची संख्या वाढवावी
वसुधा नाईक प्रतिनिधी पुणे
पुणे: दि. 22/06/2025, रविवार रोजी आम्ही सहकुटुंब प्रतापगडला गेलो होतो. डोंगरदर्यातली वाट,निसर्ग सौंदर्य अप्रतिम होते. दुपारी पण धुकं होते, ढग पण खाली आले होते. रस्ता दिसत होता. मात्र दरी धुक्यानं झाकली गेली होते त्यामुळे दरीतले नयनमनोहर दृश्य दिसले नाही. प्रतापगडावर गेलो. तिथे देखील ढग खाली येऊन धोक्याचे प्रमाण वाढलेले होते. पावसाचे थेंब येत होते.येताना जरा संध्याकाळ झाली. अंधार पडायला लागलेला होता. गड उतरता,उतरता अंधाराचे साम्राज्य वाढायला लागले. पावसाची रिमझिम सुरू झाली होती.
अंधारात गाडीच्या फोकसमुळे रेडियम रिप्लेक्टर पोल दिसल्यामुळे रस्ता समजत होता. पण काही ठिकाणी हे रेडियम रिफ्लेक्टर पोल नसल्यामुळे समोरच्या रस्त्याचा अंदाज येत नव्हता. आमची गाडी अगदी दहा, विसच्या स्पीडने पुढे जात होती.जीव मुठीत घेऊन आम्ही गड आणि पसरणी घाट उतरलो. माझी शासनाला एकच विनंती आहे की अशा अनेक गाड्या, अनेक कुटुंब,अनेक मित्रपरिवार शिवरायांचा हा प्रतापगड पाहण्यासाठी येत असतात. निसर्गाने धुक्याची दुलई पांघरल्यामुळे रस्ते दिसत नाहीत. तर शासनाने रेडियम रिफ्लेक्टर पोल वाढवावेत ही शासनाला नम्र विनंती आहे.
रेडियम रिफ्लेक्टर पोल वाढवल्यामुळे अपघाताची शक्यता कमी राहील. अंधारात देखील आणि धुक्यामध्ये देखील आपल्याला गाडीच्या फोकस मुळे रस्ता समजण्यास मदत होईल. या विनंतीचा शासनाने विचार करावा.
समाजसेविका,लेखिका, बातमीदार
वसुधा वैभव नाईक, धनकवडी, जिल्हा- पुणे



