0
4
8
2
9
3
चंद्रयान
आई मला चंद्रयान आणून दे ना
चंद्रयानात बसेन, आकाशी फिरेन।
चांदामामा भोवती चकरा मारेन
गाेल गोल गोल……।।१।।
आई मला चंद्रयान आणून दे ना
चंद्रावर जाईन, चांदोमामाला भेटीन।
चांदामामासवे पुरणपोळी खाईन
गोड गोड गोड……..।।२।।
आई मला चंद्रयान आणून दे ना
चंद्रावर जाईन, मजाचमजा येईल।
चंद्रावरुन पृथ्वीचा फोटो घेईन
क्लिक क्लिक क्लिक…..।।३।।
आई मला चंद्रयान आणून दे ना
चंद्रावर जाईन,मैत्री करीन चांदण्यांशी।
खेळ खेळीण लपाछपी चंद्रतारेंशी
लपा लपा लपा……..।।४।।
आई मला चंद्रयान आणून दे ना
तिरंगा घेईन, चंद्रावर जाईन।
भारताचा तिरंगा ध्वज लहरेल
लहर लहर लहर…….।।५।।
गणेश नरोत्तम पाटील
ता.शहादा,जि.नंदूरबार
0
4
8
2
9
3



