गुरुवारीय चित्र काव्यस्पर्धेतील रचना
????
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध क्र.१३७ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे.*
????
*प्रारंभ*
आला आला पाऊस
करू लावणीला प्रारंभ
आनंद झाला खास
डोललं शिवार उभ ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
वरूणराजाची कृपादृष्टी
प्रारंभ करू भात लावणीला
यंदा पीक येईल जोमाने
मीळे दिलासा बळीराजाला
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
काळी आई ओलावली
पावसाच्या रिमझिम धारानी
प्रारंभ झाला रोवण्यास
पोशिंदा काम करतो जोमानी
*सौ पुष्पा डोनीवार,चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
बरसल्या झरझर जलधारा
सुखावली धरणीमाता
प्रारंभ करूया नव्या जोमाने
भातलावणीला आता
*मीनाक्षी काटकर*
*दारव्हा यवतमाळ*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
काळ्या आईच्या पोटी
चला ग सयानो चला
सा-या जणी मिळून
प्रारंभ भात लावणीला…
*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
वर्षाऋतुचे झाले आगमन
मनासारखा पाऊस पडला
तरतरली भाताची रोपे
झाला प्रारंभ भात लावणीला
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*????कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
????
*प्रारंभ*
बरसल्या पाऊस धारा,
भरल्या बांध्या साऱ्या,
प्रारंभ धान रोवनीला,
बीगी बीगी चला कामाला//
*सौ. उर्मिला गजाननराव राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
प्रारंभ झाला पावसाला
लागा चला कामाला
भात लावणी करू चला
पाऊस मिळेल पिकाला
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
शिघ्र सदा करावा
शुभ कार्याचा प्रारंभ
भिजली चिंब वसुंधरा
लगबगीने पेरणी आरंभ
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
होऊ लागली भात पेरणी
पडता पावसाच्या सरी,
लगबग वाढली कामाची
सुखावला,मनात शेतकरी.
*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
प्रारंभ झाला रोवणीला
सूर लोकगीताचे गुंजले बांदीवर
हिरवे हिरवेगार पऱ्हे
डोलू लागले वाऱ्यावर.
*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
पाऊस पडला मनासारखा
दह्या सारखा झाला चिखल
प्रारंभ केला रोवणीला
निसर्गाच्या कृपेने मोती पिकल
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
चिखलात माखलेला देह
मातीशी झाला एकरूप…
लावणीचा प्रारंभ होताच
धरणीचे बदलले रूप….
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
धरणीच्या गर्भातून उगवलेले नवांकूर
निसर्गसृष्टीचा खरा आरंभ आहे
नैराश्याने खचलेल्या मनात आशेचा किरण
नवजीवनाचा खरा प्रारंभ आहे
*सौ.सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
वर्षाऋतूंचा झाला प्रारंभ
शेतीमशागतीचा पहा आरंभ
शेतात डोले पीक हिरवेगार
सृष्टी ल्याली जणू शालू हिरवागार
*सुनंदा किरसान*
*अर्जुनी मोर गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
मनासारखा पाऊस पाणी
लोण्यासारखी झाली माती
प्रारंभ झालाय लावणीचा
पिकतील रानी माणिक मोती
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️
*प्रारंभ*
पावसाचा प्रारंभ होताच
भाताची केली पेरणी
अंकूर आले हिरवेगार
झटपट केली रोवणी
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
️
️
️
️????
????
️
️
️
️





