गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान; सर्व तालुक्यांना पुराचा तडाखा
तारका रूखमोडे जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचे थैमान; सर्व तालुक्यांना पुराचा तडाखा
तारका रूखमोडे जिल्हा प्रतिनिधी, गोंदिया
बिनधास्त न्यूज नेटवर्क गोंदिया
गोंदिया: जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील वैनगंगा,वाघ, चुलबंद, गाढवी, बावनथडी, पांगोली, शशिकरण नद्या अगदी दुथडी भरून वाहत आहेत. पूरस्थिती अजूनही कायम असून काही गावांमध्ये नदीचे पाणी घुसल्यामुळे काही संसार उघड्यावर पडलेले आहेत.
नाल्यांवरही वाहणाऱ्या पुलावरील ओव्हरफ्लोमुळे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.अनेक गावांचे संपर्क आपापसात तुटलेले आहेत त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा कहर अजूनही थांबलेला नाही. संततधार सुरुच आहे.
जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केलेला आहे. नागरिकांना सतर्कतेच्या इशारा दिलेला आहे व काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अर्जुनी /मोर.तालुक्यातील रस्ते चहूबाजूंनी पूराने घेरलेले आहेत. अर्जुनी महागाव रस्ता, अर्जुनी माहुरकुडा रस्ता व अर्जुनी मोरगाव रस्ता, अर्जुनी नवेगावबांध रस्ता, तथा अर्जुनी इटियाडोह रस्ता पूर्णतः बंद झालेला आहे. अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलेले आहे.