आज मराठी भाषिकांसाठी आनंदाचा दिवस; मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान; राहुल पाटील
आज मराठी भाषिकांसाठी आनंदाचा दिवस; मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा
मराठी भाषेला दोन हजार वर्षांची परपंरा
महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान; राहुल पाटील
प्रशांत ठाकरे, सिलवासा
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर: मागील अनेक वर्षापासून तमाम मराठी भाषा रसिकांचे व प्रत्येक मराठी मनाचं स्वप्न आज पूर्ण झालेले आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला.
मराठी भाषेबरोबरच पाली, प्राकृत, असमिया आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. ‘आजचा दिवस हा इतिहासाच्या पानातील सोनेरी पान असल्याचे ‘मराठीचे शिलेदार’ संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्षापासून आम्ही शासनाची विनवणी करतोय पण राज्याचे मराठी भाषा मंडळ हे राजकारणात व्यस्त असल्याने भाषेसाठी पुढाकार घेत नव्हते; परंतु आज आमच्या भाषेला खरा न्याय मिळाला असून मराठीच्या सेवेसाठी सुरु केलेल्या चळवळीला आज यश आले आहे.
मराठी भाषा सक्षमीकरणासाठी गेले अनेक वर्ष अव्याहतपणे काम करणाऱ्या ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सर यांनी या प्रसंगी आनंद व्यक्त केला व येणाऱ्या काळात मराठीचे साहित्य अधिकाधिक समृद्ध करण्याचा मानसही व्यक्त केला.
‘मराठीचे शिलेदार’ समूह नेहमीच साहित्य समृद्धीवर भर देतो आजवर 500 पेक्षा अधिक कविता संग्रहांचे प्रकाशन करून मराठीच्या साहित्याला एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याची मराठीच्या शिलेदार समूहाचे स्वप्न आज पूर्ण झाल्याची भावना शिलेदार समूहाच्या मुख्य परीक्षक व प्रशासक ‘सविता पाटील ठाकरे’ यांनी व्यक्त केली. मराठीच्या साहित्य सेवार्थ सुरू असलेला ‘साहित्य गंध’ हा साप्ताहिक अंक अव्यातपणे सुरू ठेवण्याचा संकल्पही याप्रसंगी व्यक्त केला.
‘मराठीचे शिलेदार’ समूहाच्या या साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या दिग्गजांची मते दादरा नगर हवेली सिलवास येथून प्रशांत ठाकरे सर यांनी जाणून घेतले.
आनंदी आनंद गडे…. अभिजात मराठी भाषेला किती वर्णावे गडे….!
आज ०३ ऑक्टोबर २०२४ मराठीचे शिलेदार समूहाचे मुख्य प्रशासक तथा मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूरचे संस्थापक अध्यक्ष माननीय राहुल पाटील यांचा रात्री ८ वाजून ५२ मिनिटांनी दूरध्वनी आला. काय निरोप म्हणून आश्चर्याने विचारले तर म्हणाले, वैशालीताई अभिप्राय तात्काळ पाठवा. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आनंदाने मुखातून शब्द फुटेना. कानावर विश्वास बसत नव्हता. परत परत विचारत होते, खरंच काय म्हणून….? आज खरंच खूप आनंदाचा क्षण समस्त मायमराठी बांधवांचे खूप खूप अभिनंदन आणि अभिजात मराठी भाषा समितीचे आणि शासनाचे खूप आभार. या क्षणाला प्रत्येक मराठी मन जपून ठेवणार आणि मायमराठीला उत्तुंग शिखरावर नेणार ही खात्री आहे….! असे मत मुख्य परीक्षक व सहप्रशासक वैशाली अंड्रस्कर, चंद्रपूर यांनी व्यक्त केले.