नागपुरात उद्या असे असेल हवामान
विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाज
नागपुरात उद्या असे असेल हवामान
विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाज
नागपूर: शहरात मागील कित्येक दिवसांपासून वाढलेले तापमान आणि उकड्यामुळे पुरते हैराण झालेल्या लोकाना पावसाची आतुरता लागली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी नागपूर मध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. तसेच विदर्भात मान्सूनपूर्व पावसाने काही जिल्ह्यात धुमाकूळ घालून खूप नुकसान देखील केले.
अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पावसाचा शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना जबर फटका बसला आहे.एकीकडे मान्सूनची चाहूल लागली असताना नैर्ऋत्य मोसमी पाऊस राज्यातील काही भागात पोहोचला असून येत्या काही दिवसात मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज आहे.
अशातच पुढील तीन दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांना नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटासह जोरदार वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.आता उद्या नेमक वातावरण कसं असेल त्यासाठी हवामान विभागाने नागपूर शहरात उद्याचे हवामान कस असेल ह्याचा अंदाज लावला आहे