अॅनिमेशन व व्हिज्युअल इफेक्ट्स करिअर सेमिनारचे आयोजन
सिटी प्रीमियर कॉलेजच्या २०० विद्यार्थ्यांचा सहभाग
अॅनिमेशन व व्हिज्युअल इफेक्ट्स करिअर सेमिनारचे आयोजन
सिटी प्रीमियर कॉलेजच्या २०० विद्यार्थ्यांचा सहभाग
जिल्हा प्रतिनिधी नागपूर
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर, (दि.१५ जुलै) : सिटी प्रीमियर कॉलेज, नागपूर येथे स्कील डेव्हलपमेंट सप्ताहाअंतर्गत अॅनिमेशन आणि व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX) मधील करिअर संधींवर एक विशेष सेमिनार आयोजित करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून DIZVIZ प्रोडक्शनचे संस्थापक श्री. अभिषेक आचार्य यांनी मार्गदर्शन केले. त्यांना या क्षेत्रात २० वर्षांहून अधिक अनुभव आहे. आचार्य यांनी नागपूर मेट्रो, पुणे मेट्रो, NMRDA, MMRDA आणि समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पांचे कार्य तसेच हॉलिवूड आणि बॉलिवूड चित्रपटांचे VFX ब्रेकडाउन विद्यार्थ्यांना सादर केले. अॅनिमेशन आणि VFX क्षेत्रात प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, ओटीटी, गेमिंग, शिक्षण यामध्ये प्रचंड संधी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना शिकत असताना उत्पन्न कसे मिळवता येईल, फ्री सर्टिफिकेट कोर्सेस कुठे मिळू शकतात, प्रोफेशनल ट्रेनिंग कुठे घ्यावी हे त्यांनी समजावून सांगितले. आजवर ३५००+ विद्यार्थ्यांना त्यांनी प्रशिक्षण दिले असून ते जगभरातील नामांकित स्टुडिओंमध्ये कार्यरत आहेत. आयोजित सेमिनारला प्राचार्य डॉ. विनोद गवांदे, उपप्राचार्य डॉ. दीपाली नायडू आणि सुमारे २०० विद्यार्थी उपस्थित होते.



