
*संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा
*
*मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*
*मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
*सर्वोत्कृष्ट दहा
*
*स्पर्धेचा विषय : मी ‘ढ’ झालो तर?
*
*मंगळवार : १३ / मे /२०२५*
*मी ‘ढ’ झालो तर?*
मी ‘ढ’ झालो तर?
सारे पोरं हासतील
ढब्बू ‘ढ’ म्हणत
मागे पुढे नाचतील
वर्गात माझा मग
राहणार नाही मान
मास्तर म्हणेल मला
उगा मारतो शान
पेपरात मिळेल
गोल गोल अड्डा
बाबा काढतील
मारायला डंडा
आई ही बघेल
रागात मला
घेऊन जाईल
शेत शिवाराला
सुटेल शाळा
सुटतील मित्र
नको नको बापा
ते दिवस विचित्र
करेन आता मी
अभ्यास नि अभ्यास
राहणार नाही ‘ढ’
होणार मी खास
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*मी’ढ’झालो तर?*
1मे ला,होतो जाहीर निकाल
पास आणि नापासाचा,
येतो प्रथमच, दरवर्षी
वर्षाव होतो शुभेच्छा चा.
नाव गाजते पंचक्रोशीत,
होतो गाजावजा, हुशारकीचा,
पेढे वाटप होतील खूप
पारावर उरेना शाबासकीचा.
घुसला अहंपणाचा राक्षस
येईल आळस अभ्यासाचा,
हसतील मला सारे जण
कोसळेल डोलारा फुशारकीचा.
भीती मला वाटते
मी ‘ढ’ झालो तर?
जातील सारे पुढे
राहीन मागे मी बरं.
संगत चांगल्याशी करीन
पुस्तकांशी मैत्री करीन
सदा,पुढे पुढेच जाईन
शाळेचा,अभ्यास करीन,
*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
*मी ‘ढ’झालो तर ?*
शिक्षणाचा व्याप वाढला मोठा
आजचा व्यवहार होऊ लागला खोटा
स्वार्थ भाव चालला वाढत
ही कहानी आहे नाही मनगढत
हा आहे वर्तमान युग
सारा जग चालला पुढे पुढे
आपणच कां रहावे मागे
गिरवायचे आहेत शिक्षणाचे धडे
आईवडील करतात विरोध
शळेत नाही जायचा म्हणून
कामधंदा करू लाग आम्हाला
काय मिळणार आहे शिकून
पण बाबा मी ‘ढ’झालोतर
वाचता लिहीता नाही येणार
कसं समजणार आजचा व्यवहार
सारे मला अडाणी म्हणणार
मी ‘ढ’झालो तर
कोण देईल मुलगी मला
काय इज्जत राहील माझी
कोण जवळ करील मला
आई,रोज पैसा मिळेल मला
पण रोजच शिक्षण मिळणार नाही
शिक्षणामुळे दर्जा वाढेल
कुणी जवळ करणार नाही
आई मला शिकू दे ग
खूप अभ्यास करीन
नोकरी करायची आहे
जिवनमान बदलायचा आहे
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
*मी ‘ढ’ झालो तर?*
बालपणीचा काळ सुखाचा
खेळण्यात मज्जा राहायची,
वेळ निघून जायचा भरकन
अभ्यासाची चिंता वाटायची…
अभ्यास नाहीच झाला तर
परीक्षेत मार्क कमी पडतील,
कमी गुण पाहून मित्र,घरचे
मला एकसारखं चिडवतील…
भीती लागून राहिली मनाला
कसे होईल,मी’ढ’झालो तर?
कशासाठी पुरवतात लाड
याचे माझ्याकडे काय उत्तर?
आई वडिलाचं स्वप्न शिकावं
मी ही आता घेतलाय ध्यास,
शाळा शिकून नाव कमवील
खेळणं कमी,करेल अभ्यास…
मी’ढ’झालो तर कसे होईल
अभ्यास करतो मन लावून
बदलायचं आहे आता मला
दावील पहिला नंबर आणून…
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
*मी ढ झालो तर*
सर्वच अव्वल होतील का
प्रश्न भारी पडला मला
मी ढ झालो तर करु का
समस्येवर मात करायला
मी ढ झालो तर
मागे असेल ज्यात
तेच करुन पाहण्याचे
ठेवीन सातत्य त्यात
अनेक संधी आहेत
शोधा म्हणजे सापडेल
कौशल्य करू विकसित
सहज कोडे उलगडेल
मी ढ झालो तर
प्रामाणिक कष्टाने
यशाकडे जाईल
सत्याच्या मार्गाने
दिवस असा उगवेल
घडेलच काही वेगळे
सारे विचारात पडतिल
म्हणतिल घडले आगळे
*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*मी ‘ढ’ झालो तर*
ढ ढ ढगाचा
ढब्बा काय कामाचा
कमी गुण आले
बोल मिळतो मामाचा
समजत नाही काही
तास कधी खेळायचा
बडगा पाठीवर माझ्या
कायमच अभ्यासाचा
ढ ढ म्हणजे काय
डोक्यावरून शब्द जाती
आई बाबा रागावतात
खेळण्यात किती गमती जमती
आम्ही निसर्गात हिंडलो फिरलो
असतात सांगत मज्जा
मी मात्र अभ्यासात घेरलो
कमी गुण मिळता फज्जा
खेळायला जावू का विचारले
तर आधी अभ्यास कर
जमत नसेल अभ्यास तर
म्हैशी सांभाळण्याचे काम कर
रोज रोज ऐकून हे सारे
जीव जातो कंटाळून
एकदाचे म्हणावे वाटते
द्या चार म्हैशी घेऊन
करतो मी अभ्यास हो
बुद्धीला आवश्यक तेवढा
खेळायला आवडते मला
म्हणून मी बोलघेवडा
समजते तळमळ माझ्यासाठीच
वाटते मी ‘ढ’ झालो तर
अपमान वाटेल सर्वांना
मी नापास झालो जर
पण असे होऊ देणार नाही
मनातच आहे मी ठरवलेले
न बोलता करेल असे काही
त्यांनीच असेल अभिमानाने मिरवलेले
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
*मी “ढ” झालो तर…?*
तेल लावून डोस्क्याला
आई छान भांग पाडते
दफ्तर लावून पाठीला
शाळत मला धाडते .. //
शिकून सवरून मोठा
सायेब होशील म्हणते
ओढून ताणून मला
शाळत आणून सोडते .. //
कळत नव्हतं मास्तर
काय लिवायचं फळ्यावर
मी जात होतो शाळत
पर ध्यान माझं खळ्यावर..//
ढब्बू “ढ” म्हणून सारी
चिडवू लागली पोरं
माझं मलाच कळना
आता कसं होईल म्होरं…//
एका परास एक पोरं
भरा भरा लिवायचे
बोबडी माझी वळायची
कांहीच नाही कळायचे
प्रश्न पडला मनात असा
खरंच मी “ढ” झालो तर..?
माझ्या आईच्या सपनातला
सायेब नाय झालो तर.. ?
ठरवून टाकलं मनाशी
पुस्तकाशी करेन गट्टी
मौजमस्ती हुल्लडबाजीस
देईन म्हणतो आता सुट्टी
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
*मी “ढ”झालो तर?*
शाळेत जातो
डबा खातो
धडा वाचतो
स्वच्छ लिहितो
उजळणी काढतो
पाढे म्हणतो
गाणी गातो
पटांगणात खेळतो
धावत घरी येतो
दप्तर टाकतो
सायकल चालवतो
पकडापकडी खेळतो
आईचा फोन घेतो
उशिरापर्यंत जगतो
मोबाईल पाहतो
अभ्यासाचा वेळ निघून जातो
फोनच्या नादात मी ‘ढ’झालो तर
आई-बाबा रागावतील
येता-जाता रट्टे मारतील
वर्गातील मुले हसतील
बाई हातावर छडी देतील
*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
*मी ढ झालो तर*
मी ‘ढ’ झालो तर..
असे मी का म्हणावे..
मीच माझ्या मनाला
का दुबळे ठरवावे..
अभ्यासात जरी
असलो मी मागे..
इतर कलागुणांचाही
निकाल तर लागे..
कबड्डी असो की पळापळ
खो-खो असो की बुध्दीबळ..
माझा असतो पुढेच नंबर
मग का असे म्हणावे मी
मी ‘ढ’ झालो तर…
पटांगणी खेळातही
लागत असते बुद्धी..
तरच तर होणार त्या
खेळांमधेही वृद्धी..
सर्वच फक्त पुस्तक वाचली
तर कसे होणार धोनी,कोहली..
मला नाही जमत ग आई
ती पुस्तकांची धोकंपट्टी
नापास ही होणार नाहीच
पण हवं तर घे तू तेव्हा कट्टी..
सर्वच बनू लागले इथे
डॉक्टर आणि इंजिनिअर..
तर सुने पडतील क्रीडांगण..
शिकू द्या ना आम्हाला तुम्ही
ज्याच्यात आमचे लागते मन..
म्हणून सांगतोय तुला ऐक
नको विचार करुस असा..
मी ‘ढ’ झालो तर…
मी ‘ढ’ झालो तर..
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
*मी ‘ढ’ झालो तर…?*
मी ढ झालो तर,असा मी
विचारच नाही करणार….
कायम अभ्यासाचीच मी
सरळ वाट धरणार….१
मला खूप अभ्यास करून
इतिहास आहे घडवायचा…
अशिक्षित पणाचा शिक्का
पुढे मुळीच नाही वाढवायचा…२
त्यातूनही पुढे मी ढ झालो तर
पेलेल ते काम इमानदारीने करेन…
आणि कायम प्रामाणिक कष्टासाठी
नेहमी सत्याचाच मार्ग धरेन….३
अभ्यासात मी ढ झालो तर
इतर गोष्टीत हुशार बनेन ….
आई-बाबांसाठी मात्र कायम
स्वर्गातूनही अमृतच आणेन…४
अभ्यासात मी ढ झालो तर,इतर
गोष्टीतून ती भर भरून काढेन….
आणि समाजात मात्र सुसंस्कारित
मुलगा म्हणूनच मी सदैव वाढेन…५
मी ढ असलो तरीही माझ्या
आई-बाबांचा बनेन श्रावण बाळ…
आणि भविष्यात त्यांची सेवा करून
दाखवीन त्यांना जीवनी आनंदी काळ…६
ढ असणं हा काही
नाहीच निव्वळ गुन्हा….
तरीही मी हुशारीसाठी
प्रयत्न करत राहीन पुन्हा पुन्हा…७
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.
*
*संकलन /मुख्य प्रशासक
*
*राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
*मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*