शिक्षक संघटनाच्या नेत्यांनी घेतले अधिकारी प्रशासनासमोर लोटांगण
शिक्षक बंधू भगिनींनो एकदा विचार तर करून पहा
शिक्षक संघटनाच्या नेत्यांनी घेतले अधिकारी प्रशासनासमोर लोटांगण
शिक्षक बंधू भगिनींनो एकदा विचार तर करून पहा
नाशिक: सर्व शिक्षकांना हे ज्ञात आहॆ की आपल्या शिक्षक संवर्गात बढतीसाठी संधी खुप कमी आहेत. म्हणून चटोपाध्याय सारख्या आयोगाने दखल घेत शिक्षकांना आश्वाशीत प्रगती योजना दिली. अगदी थोडी पदोन्नतीची संधी आणि त्यात प्रशासनाची पदोन्नती देण्याबाबतची नेहमीची दिरंगाई.
शैक्षणिक पात्रता असतानाही कित्येक शिक्षकांना निवृत्तीपर्यंत कोणतीही पदोन्नती मिळत नाही. त्यापैकीच एक म्हणजे केंद्रप्रमुख पद भरती. प्रभारी केंद्रप्रमुखाचे कामे शिक्षकांनी केल्यामुळे शासनात सदरची भरती करण्याची गरज वाटत नाही. किती वर्ष झालेत केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहे. मागील काही काळात प्रभारी केंद्रप्रमुख नियुक्तीला विरोध केल्यामुळे आपल्यापैकी काही बांधवांना केंद्रप्रमुख बनण्याची संधी मिळाली. यामुळे येथून पुढेही प्रभारी केंद्रप्रमुखाची कामे न करणे शिक्षकांच्या हिताचे होते आणि राहील.
परंतु निफाड तालुक्यातील इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना याचा विसर पडलेला दिसतो. नाहीतरी इतर वेळेसही हे अधिकाऱ्यांच्या पुढे मागे करून लाळघोटेपणा करून मर्जी संपादन करण्याची स्पर्धा करताना तुम्ही बघितलेच आहे. यातीलच एक भाग म्हणजे प्रभारी केंद्रप्रमुखांच्या ऑर्डर काढताना खुशाल निर्लज्जाप्रमाणे त्यास संमती दर्शवणे. आपल्याकडे शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांवरती अन्याय करून अध्यापनाचा वेळ असल्या प्रशासकीय कामात खर्च करून अधिकाऱ्यांची मर्जी संपादन करण्यात धन्यता मानतात. यावर कळस बघा! शिक्षक संघटनेचे नेतेच प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून मिरवतात. गरीब विद्यार्थ्यांची ना संघटना, ना एकता, की जे तुमच्या विरोधात आवाज उठवतील. स्वतःचे काम सोडून प्रशासनाचे काम, प्रशासनाला मदत करण्यामध्ये इतका पुळका का?
निफाडसह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत इतर शिक्षक संघटनांच्या जिल्हा तालुका पदाधिकाऱ्यांनीच प्रभारी केंद्रप्रमुख नियुक्तीची स्वतःहुन मागणी केली लाजिरवाणी गोष्ट आहे. मात्र यांपैकी श्री राजेंद्र साळुंके या शिक्षक परिषदेच्या कार्यकर्त्याने सत्याची बाजू घेत विरोध दर्शवला आहे आणि सर्व शिक्षक संघटनांना विरोध करण्याचे आव्हान केले आहे.
शिक्षक परिषद या विरोधात आवाज उठवेल. टप्प्याटप्प्याने यांच्या शाळेवरून माहितीच्या अधिकाराखाली यांच्याविषयी माहिती संकलित केली जाईल. यांच्या केंद्रप्रमुख काम करताना शाळेला मारलेल्या दांड्या उजेडात आणल्या जातील. ज्या अधिकाऱ्यांनी यांची नियुक्ती केली त्यांच्यावर व यांच्यावर कारवाई होईपर्यंत शिक्षक परिषद लढा चालू ठेवील.