केंद्रीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न
रजत डेकाटे प्रतिनिधी
केंद्रीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सव संपन्न
तारसा केंद्रातील सिंगोरी (नरसाळा) येथे आयोजन
रजत डेकाटे प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
नागपूर: मौदा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या केंद्र तारसाच्या वतीने केंद्र क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन सिंगोरी(नरसाळा)येथे करण्यात आले होते. यावेळी सावित्रीबाई फुले, माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नागपूर जिल्हा परिषदेच्या सदस्या शालिनी देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी क्रीडा ध्वजाला सलामी देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य मौदा कीर्तीताई पायतोडे, शांतकला टेकाम अध्यक्षा शाळा व्यवस्थापन समिती सिंगोरी (नरसाळा), अजाबराव टेकाम सरपंच गट ग्रामपंचायत नरसाळा, मंगेश वैद्य सदस्य गट ग्रामपंचायत नरसाळा, या पाहुण्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
खो-खो, कबड्डी,लंगडी,रिले या मैदानी खेळामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. इतकेच नव्हे तर सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा सांघिक नृत्य, सामूहिक गीत गायन, वेशभूषा, नक्कल एकपात्री, वकृत्व स्पर्धा या स्पर्धेमध्ये भाग घेऊन शाळेतील विद्यार्थी उत्साही दिसून आले.
दोनशे मीटर दौड मध्ये वरिष्ठ गटातील प्रतीक दिनेश ठाकरे नरसाळा हा पहिला आला तर मुलींमध्ये नेहारिका भोजराज धोटे ही पहिली आली.
वरिष्ठ गटामध्ये उच्च प्राथमिक शाळा नरसाळा येथील विद्यार्थ्यांनी कबड्डी मध्ये बाजी मारली तर तारसा येथील मुलींनी कबड्डी मध्ये बाजी मारली.
खो-खो मध्ये नरसाळा येथील मुलांनी पुन्हा एकदा तारसा मधील मुलींनी खो-खो खेळात बाजी मारली.
तर कनिष्ठ गटामध्ये कबड्डी मध्ये कुंभापूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी तर नरसाळा शाळेतील मुलींनी कबड्डी खेळामध्ये बाजी मारली. खो-खो नरसाळा येथील मुलींनी तर लंगडी मध्ये नरसाळा येथील मुली विजयाचा बहुमान पटकावला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश शेंडे यांनी केले तर प्रास्ताविक तारसा केंद्राचे केंद्रप्रमुख अनिल कुमार पत्रे यांनी केले तर सिंगोरी (नरसाळा ) येथील मुख्याध्यापक राजू नवनागे यांनी आभार मानले.
यावेळी गणेश कुंभलकर, अमरदीप कावळे, सुधाकर हटवार, मनोज गुळधे, मारुती शहाणे, किशोर नागदेवे, किशोर डोंदलकर, सायली शेंडे, शालिनी कावळे, प्रियंका पाटील, संध्या ढोके, सोनाली मते, चित्रा थोटे, प्राजक्ता राऊत यावेळी उपस्थित होते.



