*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*
*🥀विषय : पापणकाठ🥀*
*🍂बुधवार : ०९/ एप्रिल/२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*पापणकाठ*
काय झाला गुन्हा कळेना,
का तुटलीय प्रेमगाठ…?
विरहामध्ये झाले आहे,
ओलेचिंब “पापणकाठ”…१
तुझ्या इच्छा सांभाळताना,
जरी लागली माझी वाट…
अहोरात्र कष्ट साहले,
तरी सोसला तुझा आट…२
सोडून गेली एकट्याला,
झालेय जीवन सैराट…
डोळ्यातून वाहत आहे,
निरंतर अश्रूंचा पाट…३
झाली निष्ठूर कशी गडे,
काय घडले मज पाप…
‘सुधाकरा’ विश्वास ठरे,
मोकळ्या जीवनास शाप…४
*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*पापणकाठ*
उशी खाली फोटो तुझा
त्यात भास तुझा होतो
आणखी एका गडद रात्रीला
मग मी सामोरा जातो
पळे सरती घटिका सरतात
विरह सरत नाही
तुझ्या आठवणी शिवाय
बाकी उरत नाही काही
पापणकाठ ओलावून माझे
ढळती अश्रू फोटोवर
अश्रू पुसाया तू न जवळी
रुसतो क्षणैक नशीबावर
रातराणीचा गंध दरवळे
खिडकीतला चंद्र मजला हसे
धुंद क्षणांच्या आठवणींत
मग तारे मी मोजित बसे
उशीखाली फोटो तुझा
वाटे कधी खट्याळ हसे
आमावस्येच्या रात्री माझ्याशी
लाडीकपणे लपाछपी खेळे
उशीखालचा फोटो तुझा
असाच मी जपणार आहे
माझ्या मनीचे गुज आता
फोटोलाच सांगणार आहे
*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*पापणकाठ*
एकुलता एक पुत्र माझा
देश सेवे करीता सीमेवर
छातीवर मी दगड ठेवून
पाठविले त्याच्या मनावर
भारतीय जवान व्हायचं
स्वप्न मनोमन बाळगलेलं
केली त्याने मेहनत तशी
अन् स्वप्न साकार झालेलं
सीमेवर तैनात उभा असे
खडा पहारा देत शत्रूवर
वाहून घेत स्वतःला त्याने
देशसेवा कोरली हृदयावर
होता तळावर शत्रू हल्ला
झाला शहीद लढता लढता
प्राणाची बाजी लावलीय
देश रक्षण करता करता
बातमी ती वाऱ्यासारखी
प्रसारमाध्यमांनी पसरली
धाई धाई रडतांना माझी
पापणकाठ अश्रूने भरली
हळहळला गाव सगळाच
शव येई तिरंग्यात लपेटून
पापणकाठ ओलावल्या
सर्वांच्याच अश्रूनी भरून
*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*पापणकाठ*
कधी येईल पाखरू
आस दाटली मनात
दूर देशी उडाले
छबी उरली डोळ्यांत
सुनी झाली बाग
नयनी दाटले पाणी
जित्यापणी पाहिल रे
राजा तुझी राणी
वाट पाहून थकला
मृत्यू शय्येवर झोपला
आठवांना मागे ठेवून
सूर्य बापाचा लोपला
शेवटची घेईन भेट
डोळे मिटेन शांत
ओलावले पापणकाठ
नसे मनी भ्रांत
*डॉ.सौ.मंजूषा साखरकर*ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. ‘अभिजात मराठी २०२५’ विशेषांकासाठी साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*पापणकाठ*
कमलनयनी होते मी तुझी
आठवे एकांतातली ती
प्रेमाची हाक …,….
काय अपराध माझा…?
का!भोगते यातना मी ,निष्पाप ….
मन वैरागी झाले रे …
न राहिला मोह अभूषणांचा
छळतात वस्त्र अलंकारही,
राजवैभव तुजविण राजसा…. शून्य ..
न पाही मी, दर्पनात
शत्रूसम भासतो मज
दाखवी नेत्र ,गडद वर्तुळे
अन पापणकाठ ओलावले….
कित्येक दिन गेले सख्या
गेल्या कित्येक रात्री
रात्रही वैरीन झाली
नित्य आभास तुझा ….
न दोष तुझा न माझा
प्रारब्ध म्हणू की नियती
असह्य यातनांचा काहूर
अन् विरहाग्ऩित तप्त मी…..
प्रेमिका की ,विरहिणी,
लक्ष्मणा तुझीच भार्या
‘उर्मिला’ तुझ्याचसाठी आसक्त …मी…. …
*सौ सुरेखा कोरे*
*नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*पापणकाठ*
लेक निघाली सासुराला
तेव्हा दाटुन कंठ आला
नयनी थेंबाळी अश्रुधारा
मातृ पापणकाठ ओलावला ||
मायेचा सागर काठोकाठ भरी
आसवे पुसे पदर ओठ थरथरी
जावईबापू सांभाळा लेकीला
सोपवितो पोटचा गोळा करी ||
बाप रडे नववधु पडता पाया
ढसाढसा रडे बंधु भाऊराया
करा रक्षण बहिणीचे माझ्या
प्रेमाने लावीला जिव्हाळा माया ||
माहेरवासिनी सुवासिनी
पाणावी अश्रू सख्या मैत्रिणी
चिमणी दिसेना माहेरांगणी
ओटी भरून करीतो पाठवणी ||
लाडा नवसाची लेक माझी
वाढली लाडात संस्कारात
तळहाताच्या फोडाप्रमाण जपलं
लहानाची मोठी आधारात ||
*प.सु.किन्हेकर, वर्धा*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*पापणकाठ*
त्या चिंब पावसाच्या
आठवांत नित्य झुरते
त्यांविना वेगळे काही
जीवनी तिच्या ना उरते ।।
डोळ्यात वाट त्याची
पापणकाठ तुडुंब
त्याचेच मनी जपले
ओलेते रुप चिंब ||
त्याच्या विना हे जगणे
ओसाड देह झाला
भेगाळल्या भुईचा
जीव भेटीस आसुसला ||
सृजनाचा धर्म तिचा
त्याच्या विनाच व्यर्थ
कोसळता तो बेबंद
जीवनास मिळे अर्थ ||
अंगांगी स्पर्श त्याचा
मृदगंध तोची भिनला
गंधाळला देह अवघा
क्षणी चिंब चिंब झाला ||
संपली आता प्रतिक्षा
जगणेची धन्य झाले
त्याने स्वत:स आता
ठायी ठायी हो पेरले ||
मिलन हे पावसाशी
स्वप्न हिरवे अंकुरले
भुईवर डोलती नवे
कोंब कोवळे कोवळे ||
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*पापणकाठ*
अश्रूजलाने भरलेला
ह्रदय डोह काठोकाठ
एकेक स्मृतीचा खडा
पडतो त्यात पाठोपाठ…
उचंबळतो ह्रदय सागर
किनार्याशी पडते गाठ
ढासळतात स्वप्न मनोरे
ओला होतो पापणकाठ..
जिकडे तिकडे तुझ्याच
असे आठवांचे धुके दाट
चाचपडतेय एकटी त्यात
कळेना कशी शोधू वाट…
पसरली दुःखाची रात
अंतरली सुखाची पहाट
संचित म्हणू की प्रारब्ध
हे बंबाळ झालेय ललाट..
ना गळाभेट ना नजरभेट
विरहाचा मध्ये आंतरपाट
उरला केवळ आठवातच
सरला सहवासाचा थाट..
तू अनंताचा प्रवाशी शांत
माझ्या मानसी आकांत
तू मुक्तीद्वारी स्वस्थ निवांत
आता मी अस्वस्थ अशांत..
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*पापणकाठ*
पापणकाठ डोळ्यांचा
तुझ्या आठवात ओला..
परी अजुनी पिरतीचा
झुलतो स्वप्नात झुला..
तुझ्या पैजंनांचा नाद
सांगू कोणा शोधायला..?
कुंतलांच्या आंदोलने
कासावीस जीव झाला…
तुझी डोळ्यांची भाषा
कुण्या नसे पुस्तकाला..
तुझ लाजून ते हसणं
लावी जीव टांगणीला..
तुझ्या सुटल्या बटांना
वारा येतो छळण्याला ..
त्या मोहक क्षणांना
धाड पुन्हा भेटायला..
किती वाट ती तपावी
चीर पडे काळजाला..
पापणकाठ ओथंबूनी
आसव घन बरसला..
*सौ.सारिका रामदास मोरे*
*वाई ,सातारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿
*पापणकाठ*
आसवांनी भरला जरी
हळवा हा पापणकाठ
मनातल्या जिद्दीची तू
मान असू दे सदैव ताठ
कधीतरी अनं कुठेतरी
होईलच हृदय निराश
सकारात्मक विचारांनी
तोड निष्क्रियतेचे पाश
मुळासकट उपटून घे
नकोश्या वेदनांचे रोपटे
अभिव्यक्तीने दरवळू दे
चांदण्यांचे सुगंधी सडे
दुखावल्या काळजाचे
वेळोवेळी झटक ओझे
विस्मरणास दे साथ तू
म्हणणे इतकेच माझे
चित्त भुलवणारे काही
शोध नवनवीन जीवनी
सभोवताली रेंगाळू दे
मित्रांची माळ देखणी
खळखळणारे चैतन्य
खुलू दे पुन्हा ओठांवर
भरभरून कर प्रेम तू
तुझ्या सुंदर जगण्यावर
*मीता नानवटकर नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*पापणकाठ*
मन असे गोंधळलेले
अशांतीच जणू चोहीकडे
नेहमीच पाणावलेले हृदय
मात्र हास्य चेहऱ्यावर फुले
मूक आक्रंदन हृदयामध्ये
संवेदनशीलतेत जपलेले
वरवरचे हास्य मोकळे
मात्र समाजास खुपलेले
क्षणभराचे ना सुख कधी
आठवा किती न आठवलेले
आनंदाच्या हलक्या लहरी
मात्र उडाले साठवलेले
उगाच का या शीतलहरी
अंगावरती गोंजारलेले
अनामिक ती कसली भीती
मात्र रंध्रात शहरलेले
मायेचा नशीबी न ओलावा
तरीही मनात ओला घाट
नयना मध्ये जिरवलेला
मात्र कधी न ओला पापणकाठ
*शर्मिला देशमुख -घुमरे ,बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
*पापणकाठ*
लेकीच्या लग्नाची
तयारी केली जोरदार…
भरल्या पापणकाठाने
निरोप देईल तिला घरदार…१
माझी लेक निघाली
आनंदाने तिच्या सासरी…
माझ्या भरल्या वाड्याची
सुनी दिसेल आता ओसरी…२
लाडात वाढलेली आमची
लेक आता निघाली दूर..दूर…
सर्व गणगोतांच्या पापणकाठातून
ओसंडून वाहू लागला महापूर….३
लाडके तुला निरोप देताना
हृदय वेगात वाहते….
तुझ्या आठवणींच्या शिदोरीला
मी आता कायम उकलत राहते…..४
कसा घालू आता लाडके
मी पापणकाठांना बांध…
मी सुखी राहीन इकडे
पण तू मात्र सुखात नांद…..५
तुझ्या आठवणीने माझ्या
पापणकाठांना जेव्हा येईल भरते…
तेव्हा तुझ्याच बाललीलांना मी
मनात कायमच गं स्मरते….६
भरल्या गंगा जमुना त्यांच्या
पापणकाठांना आला महापूर….
जा लाडके सुखाने सासरी,ऐकू
येऊ दे तुझ्या सुखाचे सप्तसूर….७
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📚🔸📚➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन* 🌺
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





