*संकलन,मंगळवारीय ‘बाल’ काव्यस्पर्धा
*
*मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘मंगळवारीय बालकाव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*
*मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
*सर्वोत्कृष्ट सात
*
*स्पर्धेचा विषय : सापशिडी
*
*मंगळवार : ०८/ एप्रिल /२०२५*
*सापशिडी*
चला मुलांनो आज
सापशिडी खेळू या…
खेळाच्या सोबतीने
अंकाशी जुळू या…
हातात घेऊन सोंगटी
गपकन खाली टाकायची
एक टिंब दिसता वर
गोटी बाहेर काढायची…
जेवढे पडतील टिंब
तेवढेच घर चालायचे…
सिडी जर भेटलीच तर,
सपकन वर चढायचे…
सापाच्या तोंडी जाता गोटी
रडत नाही बसायचं…
मनोरंजनाचा खेळ हा,
पोटभरून हसायचं…
शांत आणि संयमाने
टाकत राहायचा फासा..
सापडेलच गरामध्ये,
कधीतरी यशाचा मासा…
चला मुलांनो आज
सापशिडी खेळू या…
शांत,सयंमी धैर्याचे
धडे यातून गिरवू या…
धडे यातून गिरवू या…
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*सापशिडी*
सापशिडी सोंगटीचा खेळ
दुसऱ्यावर मात करून
खेळावा अनोखा खेळ
संपतो सापाने गिळुन ॥१॥
एका सोंगटीचा निर्णय
पडतो कांही वेळा भारी
किमया करतो काय
करायला लावतो वारी ॥२॥
चलाखी ठेवून
उलटावी बाजी
सापाला हटवून
ठरवावे पाजी ॥३॥
मोजून घर
फिरवावी सोंगटी
करावा विचार
जिंकावे खावून उलटी ॥४॥
चिंटू पिंटून
करून कडी
सापशिडी जिंकून
मारली उडी ॥५॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*सापशिडी*
चाल न ग ताई आपण
खेळू सापशिडीचा खेळ
गडी गडी बसू दोघे
मस्त जमेल तालमेळ
रोंन्टी खायची नाही
खेळू आपण ईमानदारीनं
गोंट्या फेकू आपल्या परिने
नंबर प्रमाणे करू चालणं
कुणी कसेही चालायचे
सांगायचे नाही कुणाला
सर्वांनाच माहीत आहे खेळ
मजा येईल आपल्या दोघाला
सापाचा तोंड आला की
भांबरी. उडते सर्वांची
हळूहळू चालतात सर्व
जम नाही बसत कुणाची
नंबराच्या गोट्या दोघेही फेकतात
केव्हा तेतात एक दोन
ज्यास्त चालता जमत नाही
तेव्हा राहतात सर्वच मौन
सापाचा तोंड आला की
मी त्यालाच भेत असतो
शेपुट असते खाली
वर जाता येत नसतो
सापशिडी हा खेळ
असतो खुप मजेदार
कुणाची ना कुणाची
होत असते हार
होत असते हार
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १६५ साठी आजच साहित्य पाठवावे.*
*सापशिडी*
ताई ,दादा…सोबत
मी सापशिडी खेळीनं
माझ्या गोटीला पुढे
हलवून मजेत टाकीन ।।
खेळाला अमुच्या मग
रंगत वेगळी येईल
ताई ,दादाच्या मनी
लकीर आनंदी फिरेल ।।
शिडीच्या पायथ्याशी
माझी गोटी बसविनं
अलगद दादाला आमुच्या
तोंडून सापाचा घसरविण ।।
किती मज्जा येईल तेव्हा…!
दादा रडत बसेलं
माझ्या दादा समोर
मी मिठाई ठेविलं…….।।
सुंदर पक्षावानी मन
माझे गगनी उडेल
खुशीने जिंकण्याच्या
आसमंत दरवळेल… ।।
*कंचना मंडपे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*सापशिडी*
परीक्षा झाल्या सुट्टी झाली
खेळायची मज्जा खूपच भारी
या उन्हाचा झाला कहर
घरात अडकून बसली सारी
उष्णतेची लाट आली
बाहेर निघता येईना
काय करावे आता
मला काही समजेना
चला काढू काहीतरी
बसून खेळू डाव
चिडीमिडी खेळायचे नाही
जिंकायची नको हाव
काय खेळू काय खेळू
आई मला सांग ना
चेस लुडो कॅरम सापशिडी
काय खेळायचे बोल ना
चल खेळू सापशिडी
खेळात मज्जा फार
सापाच्या तोंडात जाते सोंगटी
वापस यावे लागे गपगार
शिडी चढायचा आनंद भारी
सापाची वाटते भीती
किती वेळा चढलो
मोजले ना उतरलो किती
हार जीत होत राहते
खिलाडू वृत्तीने खेळू खेळ
बोर होण्याचा प्रश्नच नाही
सापशिडीचा लागला मेळ
*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
*सापशिडी*
चौरसाकृती आकार
त्यावर कप्पे चौकोनी
खेळ लहान मोठ्यांचा
पृष्ठ असते जाड पानी
शिडी भेटता सोंगटी
उंचावर जाते सर सर
सापाच्या तोंडात जाता
खाली येते घसर घसर
सापशिडी बैठक खेळ
खेळ आहे हा पारंपरिक
मनोरंजन करतो भारी
सगळीकडे नावलौकिक
सोंगटीचे फासे टाकू
चढाओढ हसत खेळत
बुद्धीचा विकास होतो
खेळातून होवू प्रगत
आकड्यांचे ज्ञान होते
वाढते समयसूचकता
खेळामधून हार जित
शिकू खेळता खेळता
*सौ.आशा कोवे- गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*सापशिडी*
उन्हाळ्याच्या सुट्टीत
सापशिडी खेळायची
चव्वा अष्टा बार्यात
सारेच रमून जायची
सापशिडीचा खेळ
आगळा वेगळा आहे
गोटीचा ताळमेळ
डोके लावुन पाहे
शेपटी की तोंडावर
गोटीवर अवलंबून
घर मागे जावु नये
नेमाने फासा टाकून
सापशिडीचा खेळ
एकदाचा समजला
मागे राहीले बुद्धिबळ
फासा बरोबर सरकला
*ज्योती चारभे वर्धा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
*सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.
*
*संकलन /मुख्य प्रशासक
*
*राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘आम्ही बालकवी’ काव्यसमूह*
*मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*