Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरब्रेकिंगविदर्भ

मालेवाडा येथील वाचनालयाची दयनीय अवस्था

रजत डेकाटे, प्रतिनिधी भिवापूर/ मालेवाडा

0 4 8 2 8 2

मालेवाडा येथील वाचनालयाची दयनीय अवस्था

ग्रामपंचायतीचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष

रजत डेकाटे, प्रतिनिधी
भिवापूर/ मालेवाडा

मालेवाडा: (दि २४) ‘पुस्तक वाचल्याने मस्तक सुदृढ बनते’ या पूर्वीच्या ग्रामीण वचनाकडे जर ग्रामपंचायत पाठ फिरवत असेल तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी जायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथील ग्रामपंचायतीच्या वतीने सुरू केलेले वाचनालय सध्यास्थितीत खंडार बनल्याचे चित्र मालेवाडा येथे पहायला मिळत आहे.

सदर विद्यार्थ्यात वाचन संस्कृती दृढ व्हावी या उद्देशाने वाचनालय सुरू करण्यात आले होते. सध्या एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र ग्रामपंचायतीच्या वतीने त्या वाचनालयामध्ये पाहिजे तशा सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने नवयुवक तरूण, तरुणींनी पुस्तके वाचण्यासाठी बसायचे कसे ? पडक्या इमारतीमध्ये वाचनालयाची निर्मिती केल्याने मालेवाडा ग्रामपंचायत प्रशासन त्याची देखभाल करीत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ग्रामपंचायत याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे.

या वाचनालयात संदर्भ ग्रंथ, साहित्य, कांदबरी अशी वाचनीय महागडी पुस्तके उपलब्ध असून, पुस्तकाची सुद्धा स्थिती खराब अवस्थेत दिसून येत आहे. पावसाळ्यात वाचनालयात बसायचे कसे ? तसेच पुस्तके वाचायची कशी ? पाऊस पडल्यावर त्या इमारतीच्या भींतीला ओल येतं असते. स्थानिक प्रशासन वाचनालयात असलेल्या पुस्तकाची सुद्धा देखभाल करीत नसल्याने तेथील पुस्तके खराब अवस्थेत पडलेली आहे.

पुस्तक हे ज्ञानाचे भंडार असून त्याची निगा राखणे हे आपले कर्तव्य आहे. मालेवाडा हे गाव धार्मिक आणि राजकीय असल्याने पुस्तकाकडे वळणारी तरुण मंडळी मात्र दूर झालेली आहे. वाचन संस्कृती टिकायला हवी याकरिता वाचनालयात आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात अशी नवयुवकांची मागणी आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे