एम. बी. पटेल महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
एम. बी. पटेल महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा
जिल्हा प्रतिनिधी गोंदिया
बिनधास्त न्यूज नेटवर्क
गोंदिया: मनोहर भाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय सालेकसा येथे महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ. बी. के. जैन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ परिमल डोंगरे, डॉ. आर. यू. गायकवाड, डॉ. एन. एम. हटवार, प्रा.गणेश भ दाडे ,प्रा. राकेश रोकडे,सुरेंद्र बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी विद्यार्थी मेळावा नुकताच घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्व. मनोहरभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रा. गणेश भदाडे ,प्रा राकेश रोकडे ,सुरेंद्र बिसेन, पवन पाथोडे यांनी त्यांच्या यशस्वी जीवनात महाविद्यालयाचे किती योगदान आहे ते सांगितले. व या महाविद्यालयाच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले. प्राचार्य डॉ बी. के. जैन यांनी या महाविद्यालयच्या विकासात माजीविद्यार्थ्यांचे योगदान असल्याचे सांगून भविष्यात विद्यार्थी नेहमीच महाविद्यालयाला सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त केली.
कार्यक्रमांचे संचालन व प्रास्ताविक डॉ नामदेव हटवार,आभार प्रदर्शन डॉ अश्विन खांडेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ वर्षा गंगणे, प्रा भगवान साखरे, प्रा वाय. आर. जोगी, ग्रंथपाल अरविंद भगत, प्रा.मनोहर वाघेरे, प्रा.राकेश बहेकार ,प्रा मंडले, काजल कोहरे , मुरली मेश्राम, प्रकाश गायधने, रमेश पाथोडे, शुभम नंदीस्वर विनय कुमार नागपुरे, पूजा कुंभारे, पायल उके यांनी परिश्रम घेतले.





