Breaking
अमरावतीअलिबागअहमदनगरआरोग्य व शिक्षणई-पेपरकविताकोकणक्रिडा व मनोरंजनखानदेशगडचिरोलीगोंदियाचंद्रपूरचारोळीछत्रपती संभाजी नगरदादरा नगर हवेलीदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरनांदेडनाशिकपरभणीपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रपुणेबीडब्रेकिंगभंडारामराठवाडामहाराष्ट्रमुंबईविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

“गौरव अभिजात मराठी २०२५”

राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेची नोंदणी

0 3 1 7 9 3

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर

“गौरव अभिजात मराठी २०२५”

राज्यस्तरीय भव्य काव्यवाचन स्पर्धा, अभिजात मराठी विशेषांक व पुस्तक प्रकाशन आणि पुरस्कार वितरण सोहळा

राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेची नोंदणी

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे मराठी भाषेस अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर प्रथमच यंदा ‘राज्यस्तरीय भव्य काव्यवाचन स्पर्धा’ दिनांक ७ मे २०२५ रोजी ‘छत्रपती संभाजीनगर’ येथे आयोजित करण्यात आली असून, संस्थेचे वार्षिक व आजीवन सभासद या स्पर्धेत नोंदणी शुल्क रू ५०० भरून सहभागी होऊ शकतात. संस्थेचे सभासद नसलेल्या स्पर्धकांना संस्थेचे वार्षिक सभासद शुल्क २०० रू व स्पर्धा नोंदणी शुल्क ५००रू असे (एकूण ७००रू) सहभाग शुल्क भरावे लागेल. शिलेदार प्रशासनातील कुणालाही यात सहभागी होता येणार नाही.

काव्यवाचन स्पर्धेतील विजेत्यांसाठी रोख बक्षीस

१) प्रथम विजेते पुरस्कार: ३००० रू रोख , शाल, स्मृतीचिन्ह, विशेषांक प्रती व सन्मानपत्र

२) द्वितीय विजेते पुरस्कार: २००० रू रोख , शाल, स्मृतीचिन्ह, विशेषांक प्रती व सन्मानपत्र

३) तृतीय विजेते पुरस्कार: १००० रू रोख , शाल, स्मृतीचिन्ह, विशेषांक प्रती व सन्मानपत्र

४) उत्तेजनार्थ एकूण १० पुरस्कार: प्रत्येकी ५०० रू रोख , स्मृतीचिन्ह, विशेषांक प्रती व सन्मानपत्र

मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक महाकाव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक असतील.

सर्व सहभागी स्पर्धकांच्या कविता छायाचित्रासह ‘अभिजात मराठी’ विशेषांकात निशुल्क प्रकाशित करण्यात येईल.

नोंदणी शुल्क भरलेल्या सहभागी स्पर्धकांनी खालील सहप्रशासक सहसंपादकांना आपली एक कविता व छायाचित्र पाठवावे.

१) सविता पाटील ठाकरे (कार्यकारी संपादक)
96243 12560
२) स्वाती मराडे (मुख्य सहसंपादक)
91306 59737
३) तारका रूखमोडे (उपसंपादक)
95185 59145

स्पर्धेची नोंदणी केलेल्या संस्थेच्या सदस्यांना संमेलनाच्या ठिकाणी आय कार्ड देण्यात येतील. करिता जुन्या सदस्यांनी आपल्या आय कार्डचे फोटो ‘सौ स्वाती मराडे’ यांना पाठवावे.

मराठीचे शिलेदार प्रकाशनातर्फे मागील ४/५ वर्षात ज्यांनी पुस्तके प्रकाशित केली आहे. अशा कवी कवयित्रींना संस्थेतर्फे सन्मानपूर्वक मानपत्र प्रदान करण्यात येणार आहे. करिता यासाठी रू ५०० रू शुल्क भरावे. (मानपत्रावर पुस्तकाचे मुखपृष्ठ व कवींचे छायाचित्र असेल)

संस्थेची वार्षिक सभासद व स्पर्धेचे नोंदणी शुल्क दिनांक १६ एप्रिल २०२५ पर्यंत पाठवावे. सोबत विशेषांकासाठी कविता.

सर्वच सहभागी स्पर्धकांसाठी तसेच पुस्तक प्रकाशनास येत असलेल्या कुटुंबीय सदस्यांसाठी दोन चहा, स्वादिष्ट नाश्ता व रूचकर भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सोबत मानाचा फेटाही (आयकार्ड आवश्यक) बांधण्यात येईल.

ज्यांची पूर्वी पुस्तके प्रकाशित झाली आहे अशा सदस्यांनी आपल्या कविता संग्रहाच्या निवडक प्रती विक्रीसाठी आणावयाच्या आहेत. स्टॉल उपलब्ध करून देण्यात येईल. ५०% सवलतीच्या दरात आपला संग्रह आपण विक्रीस उपलब्ध करून देऊ शकता.

जे सभासद ५०० रू नोंदणी भरून काही कारणास्तव स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही. अशा सदस्यांना त्यांचे सन्मान साहित्य व विशेषांक प्रती पोस्टाने पाठविण्यात येईल.

वार्षिक सभासद नोंदणी व स्पर्धा सहभाग नोंदणी शुल्क

खालील खात्यावर जमा करू शकता. पैसे भरल्याचा स्क्रीन शॉट मुख्य संपादक राहुल पाटील 7385363088 वर पाठवावा

📕मराठीचे शिलेदार पब्लिकेशन📕
ता.हिंगणा, जि. नागपूर

मराठीचे शिलेदार पब्लिकेशन,नागपूर
एक्सिस बँक, हिंगणा
खाते क्र 923020003169683

IFSC UTIB0001239
फोन न. 9834739798
(फोन पे किंवा गुगल पे साठी फोन न 9834739798)

अध्यक्ष/संपादक मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था, नागपूर

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 1 7 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
बातमी देण्यासाठी येथे क्लिक करा
12:01