Breaking
ई-पेपरकवितानागपूरबीडमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

काहीतरी सांगायचं?

राजश्री मिसाळ ढाकणे

0 4 8 2 9 7

काहीतरी सांगायचं?

पाटावरती फोटो मांडून बाळा
ओवाळून अर्पण राखी तुजला
दाटल्या विरहवेदना काळजात
काहीतरी सांगायचंय? मजला…!!१!!

बहीण भावाचे पवित्र प्रेम देवा
अर्ध्यात घेतले तू हिरावून असे
आठवणींचे गाठोडे बहिणींनी
आयुष्यभर सांभाळावे रे कसे…!!२!!

भैयाच्या आवडीचे सर्व पदार्थ
पण तू आता खाणार ना कधी
दुःख लपवले जरी काळजात
पण अश्रू लपेना पापण्यामधी…!!३!!

जीव की प्राण आईचा होता
म्हणून देवाला प्रिय तू झाला
जोपर्यंत श्वासात श्वास माझा
आठवण येईल क्षणाक्षणाला…!!४!!

काहीतरी सांगायचंय? तुजला
बोलतोस तू स्वप्नात रोज काही
काय बोललास माझ्याशी बाळा
हे मला सकाळी आठवत नाही…!!५!!

राजश्री मिसाळ ढाकणे
ता. जिल्हा बीड
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे