
0
4
0
9
0
3
बुडबुडे
शाळेजवळच होते ओहळ
त्यात वाहे झुळझुळ पाणी
वाहत पाणी बघून मुले सारी
आनंदाने गात असत गाणी
मस्करी करायचा रोज राजू
टाकायचा पाण्यामध्ये खडे
मज्जाच भारी वाटत असे त्याला
उठता निर्मळ पाण्यात बुडबडे
नित्यक्रम मुलांचा चालायचा
मधल्या सुट्टीत ओहळ बघायचा
आजुबाजूला हिरवी हिरवी झाडे
बघत बसायची थाट निसर्गाचा
बुडबुडे बघतांना आश्चर्य वाटे
बालमन सुखावून जात असे
खोडकर पणा चालूच त्यांचा
हे निरागस जीवन वाटे हवेसे
मोकळ्या वातावरणात भटकत
शाळा मात्र मुले बुडवत नव्हती
पाळायची गुरूजींची आज्ञा ती
मुले सारी शिस्तप्रिय गुणी होती
प्रतिमा नंदेश्वर
ता मूल जि चंद्रपूर
=========
0
4
0
9
0
3





