Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रबीडब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसंपादकीयसाहित्यगंध

झाडांची पाने ते छत्रीपर्यंतचा प्रवास -“छत्रीत माझ्या”; शर्मिला देशमुख

मंगळवारीय 'आम्ही बालकवी' स्पर्धेचे काव्यपरीक्षण

0 4 0 8 9 0

झाडांची पाने ते छत्रीपर्यंतचा प्रवास -“छत्रीत माझ्या”; शर्मिला देशमुख

मंगळवारीय ‘आम्ही बालकवी’ स्पर्धेचे काव्यपरीक्षण

“जुन्या पोत्याचा घोंगता आत नवी थरथर
रंग पिऊन दिशांचा होई हिरवी नजर,
वाढता पावसाचा जोर मन आत सैरभैर
डोईवर जीवनाचा भार अन् भिजलेली गार नजर..”

कडकडणाऱ्या विजा, गडगडणारे ढग आणि जोराचा वादळी पाऊस.. पूर्वी एकदा पाऊस लागला म्हणजे 21- 21 दिवस उघडत नसे. मग पाऊस थांबणार नाही म्हणून जगणे कसे थांबवता येणार ? प्राचीन काळी प्राण्यांची कातडी ,झाडांची पाने यांचा वापर पावसापासून संरक्षण करण्यासाठी केला जात होता. पावसाळी कपडे सुद्धा प्राण्यांच्या कातडी पासून बनवलेले आढळतात. अगदी अश्मयुगाचा विचार करता पावसापासून संरक्षणासाठी झाडाची पाने, बुंधा तसेच बांबू व माती पासून संरक्षण बनवत असत. छत्रीची उत्पत्ती कधी झाली? असा प्रश्न केला तर निश्चित उत्तर सांगता येणार नाही पण छत्रीचा इतिहास 4000 वर्षांपेक्षा मागे घेऊन जातो.

इसवी सन पूर्व 2310 मध्ये छत्री ही एका विजय प्रतिकांमध्ये आढळते. प्राचीन मेसोपोटामिया, भारत आणि चीनमध्ये छत्रीचा उपयोग केला जात असे. फक्त ऊन किंवा पावसापासून संरक्षण करणे हा प्राचीन छत्रीचा मूळ उद्देश नसून स्थिती आणि प्रतिष्ठेचे चिन्ह समजले जात असे. भारत उपमहाद्वीप मध्ये छत्रीचा उपयोग प्राचीन काळी मंदिर आणि स्मारकांमध्ये केलेला आढळतो. अठराव्या शतकात छत्रीचा सार्वजनिक रूपात वापर सुरू झाला. 20 व्या शतकापासून पॉकेट छत्रीचा शोध लागला.

वरचेवर पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पावसाचे प्रमाण कमी झाले, तरी छत्रीचा वापर कमी झाला नाही. पाऊस नसला तरी उन्हापासून ती संरक्षण करत आली आहे. तसे पाहता गरिबांसाठी छत्री म्हणजे पोत्याचा घोंगताच. यातील येणाऱ्या गर्मीला कशाचीच सर नाही. जणू गरीबांना तो मायेची ऊब देत असतो छत्री बनून. आधुनिकीकरणाचे कितीही वारे वाहत असले तरी छत्रीची जादू मात्र मनामनावर राज्य करीत आली आहे. वेगवेगळे आकार ,रंग सर्वांना आकृष्ट करतात. प्राचीन काळी डोक्यावर छत्र चामर मिरवणाऱ्या प्रतिष्ठित लोकांप्रमाणेच आजही डोक्यावर छत्री असली म्हणजे मानसन्मानच वाढतो. या छत्रीचा विशेष गुण म्हणजे विसरणे. ज्या ठिकाणी व्यक्ती छत्री घेऊन जाईल त्या ठिकाणी बऱ्याच वेळा तिला विसरून येतो असे असले तरी छत्री वरील प्रेम काही केल्या कमी होत नाही.

अशीच ही छत्री “छत्रीत माझ्या” हा विषय घेऊन बालकविता समुहात स्पर्धेसाठी उतरली आणि पावसाची धो धो पडणारी सर जणू छत्रीला वेगवेगळ्या कल्पनांनी भिजवू लागली. या छत्रीने एकमेकांना मदत, सहकार्य , मैत्रीभाव, मित्र-मैत्रिणींची दंगामस्ती, रंगीबेरंगी छत्र्यांचे वर्णन, सखी सहेलीची उपमा, छत्रीमुळे वाढणारा मित्रांमधील मानसन्मान, छत्रीसाठीची भांडणे ,छत्रीचे उपयोग , छत्री सोबतचा शालेय प्रवास नी अभ्यास, प्राणी पक्षी यांच्यासोबत चा संवाद अशा कितीतरी कल्पनांमध्ये भिजवले. छत्री असूनही भिजण्याची मजा काही वेगळीच असते, ती मजा समूहात अनुभवायला मिळाली. सर्व शिलेदारांचे अभिनंदन व शुभेच्छा. राहुल दादांनी मला परीक्षण लेखनाची संधी दिली त्याबद्दल शतशः ऋण! तूर्तास “छत्रीत माझ्या” मैत्रिणींसोबत पावसाची मजा घेण्यासाठी थांबते… धन्यवाद!!

शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
मुख्य परीक्षक,सहप्रशासक, कवयित्री
©मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (3 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 8 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे