कोयता, तलवारीची भाषा करणा-या पंकजाताईस…!!!
मुख्य संपादक
कोयता, तलवारीची भाषा करणा-या पंकजाताईस…!!!
प्रिय पंकजाताई,
सप्रेम नमस्कार
आपण शिकलेल्या आहात व लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या कन्या आहात या पेक्षा आपली ओळखं काय आहे? आपल्या भावाने आपणास त्रास दिला त्यावेळी हे मराठेच आपल्यासोबत उभे होते व आपण लाखोंच्या मताधिक्याने निवडून ही येत होतात. पण काल आपण कोयत्यांना धार लावण्याची भाषा केली ते कोणा विरोधात वापरणार आहात ? पाकिस्तान का चीनच्या लोकांविरोधात? पण तसं तर आपण काही म्हणाला नाहीत? मग आपला रोख जरांगे पाटील व मराठा समाजाकडेच होता. ऐवढे न समजायला समाज मूर्ख तर नक्कीच नाही.
शेवटी आपण भुजबळांच्याच वळणावर गेलात. भुजबळांच्या काही मजबूरी होत्या, केलेली पाप, भ्रष्टाचार लपवण्यासाठी महात्मा फुले , सावित्रीमाईची शिकवण विसरून मालकांच्या सांगण्यावरून मराठा समाजावर भुंकत राहिला ,त्यांनी ही तलवारीला धार लावा ,मराठ्यांच्या हजामती करू नका म्हणाले त्याला महाराष्ट्रातील आठरापगड जातीतील जनतेने नाकारले.
पण आपणास लोकसभेला ही मराठ्यांनी भरभरून मतं दिली,पण आपल्या वंजारी समाजाचे एक मत बजरंग सोनावणेना पडलं नाही याला म्हणतात जातीवाद. आपण लोकसभेला पडला त्याला आपले सर्वोच्च नेते व फडणवीस जबाबदार होते. कारण त्यांनी मराठा व मुस्लिमांना व दलितांना डिवचलं होतं, त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी भाजपाचे अनेक उमेदवार पडले त्यात अनेक मराठा उमेदवारही पडले.
आणि काल तर आपण उघड उघड कोयत्याची भाषा केली त्याने आपल्या संस्कृतीचे दर्शनही संपूर्ण महाराष्ट्राला झाले. आपल्याच देश बांधवा विरोधात कोयता तलवारीची भाषा व ते ही आपल्यासारख्या लोक प्रतिनिधीकडून होत असेल तर हे शिव, शाहू, फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. आपण कितीही कोयता तलवारीची भाषा करा पण जरांगे पाटील कधीच ती भाषा वापरणार नाहीत. उलट तो मराठा आरक्षणाचा लढा संविधानीक पद्धतीनेच लढत आहेत जरी त्यांचं शिक्षण कमी असलं व जरी ते गरीब असले तरी त्यांची सामाजिक व राजकिय समज आपल्या सारख्या कित्येक नेत्यांपेक्षा अधिक आहे.
आणि हो आपण समाज तोडण्याची कोयत्या तलवारीची भाषा करत रहा ,आम्ही संविधानिक पद्धतीनेच त्याच उत्तर देवू कारण आम्हीच खरे शिव शाहु फुले आंबेडकरांचे वैचारिक वारसदार आहोत. तरी लवकरंच भेटू विधानसभेच्या मैदानात. आपण महिला आहात व आपल्या विषयी आमची भाषा योग्यच असेल कारण आम्ही वैचारिकतेची लढाई वैचारिकतेने लढतो पातळी सोडून नाही.