डाॅ.मधुसूदन घाणेकर म्हणजे, ‘सबकुछ किशोरदा’; वसुधा नाईक
जिल्हा प्रतिनिधी, पुणे
डाॅ.मधुसूदन घाणेकर म्हणजे,
‘सबकुछ किशोरदा’; वसुधा नाईक
जिल्हा प्रतिनिधी, पुणे
पुणे : (दि.14) वसुधा इंटरनॅशनल संस्थेतर्फ डाॅ.मधुसूदन घाणेकर यांचा नुकताच ‘माझी झुमरुगिरी’ हा 49 वा काव्यसंग्रह संस्थेच्या अध्यक्ष वसुधा नाईक यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आला. तसेच डाॅ.घाणेकर संपादित डहाळी अनितकालिकाच्या 574 व्या अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. गायक किशोरकुमार यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून डाॅ.घाणेकर त्यांनी किशोरकुमार यांच्या टाॅप 10 गाण्यांचा ‘ हमे तुमसे प्यार कितना ‘ हा कार्यक्रम सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
याप्रसंगी युवाक्रांती संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार डाॅ.राजेश्वर हेन्द्रे, शि.वा.जंगले P.S.I ,भारतीय जनता पार्टी महिला आघाडी ज्येष्ठ नागरिक संघाच्या शहर कार्याध्यक्ष भारती महाडिक, ज्येष्ठ साहित्यिक मंदा नाईक, इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्सचे उपाध्यक्ष डाॅ.राजेन्द्र शहा आदि मान्यवर उपस्थित होते.
मधुकर्णिका उर्फ सारिका सासवडे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. शशिकांत बाळासाहेब सुतार यांनी संयोजन केले. “डाॅ.मधुसूदन घाणेकर समरसतेने किशोरकुमार यांची गाणी म्हणताना सही सही सबकुछ किशोरकुमारच होतात. डाॅ.मधुसूदन घाणेकर हे गायक, अभिनेते, कवी, गीतकार, शीळवादक, निर्माते, दिग्दर्शक..सबकुछ आहेत. डाॅ.घाणेकर यांनी माझी झुमरुगिरी काव्यसंग्रहात किशोरकुमार यांच्यावरील कवितांनी धमालच उडवली आहे.असे सबकुछ डाॅ.मधुसूदन घाणेकर हे व्यक्तिमत्त्व आचार्य अत्रे यांच्या भाषेत 10,000 वर्षात होणार नाही.त्यांची अनेक क्षेत्रातील विक्रमी वाटचाल निश्चितच गौरवास्पद आहे.” या शब्दात वसुधा नाईक यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
“आयुष्यात आनंदाने कसे जगावे हे डाॅ.घाणेकर यांच्याकडूनच शिकण्यासारखे आहे.” असे डाॅ.हेन्द्रे यांनी डाॅ.घाणेकर यांच्या गौरवपर भाषणात सांगितले.याप्रसंगी मेघना मधुसूदन घाणेकर, भारती महाडिक, मंदा नाईक, दीपाराणी गोसावी, श्री.जंगले यांनी डाॅ.घाणेकर यांच्याविषयी गौरवपर मनोगते व्यक्त केली. सबकुछ किशोरकुमार यांच्या जीवनपटावर प्रकाशझोत टाकत डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी ओ साथीरे तेरे बिना क्या जीना, जीवनसे भरी तेरी ऑंखे, वो शाम कुछ अजीब थी, चिंगारी कोई भडके, कोई हमदम न रहा, रुक जाना नही आदि गाण्यांना रसिकांनी उत्स्फूर्तपणे भरभरुन दाद दिली. किशोरकुमार यांच्या काही प्रसिध्द गाण्यांवर आधारित डाॅ.घाणेकर यांनी साभिनय कविताही सादर केली. माझी झुमरुगिरी काव्यसंग्रहावर डाॅ.घाणेकर यांनी रेखाटलेले किशोरकुमार यांचे रेखाचित्रही लक्षवेधी ठरले आहे.





