Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरब्रेकिंगविदर्भसाहित्यगंध

विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत साहित्यिकच अध्यक्ष असावा; डॉ. रवींद्र शोभणे

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पॅनल निवडणुकीच्या रिंगणात सक्रीय

0 4 8 2 8 2

विदर्भ साहित्य संघाच्या निवडणुकीत साहित्यिकच अध्यक्ष असावा; डॉ. रवींद्र शोभणे

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पॅनल निवडणुकीच्या रिंगणात सक्रीय

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर : (दि १८) विदर्भ साहित्य संघाची निवडणूक -2026 ते 2031 यासाठी, विदर्भ साहित्य संघाची निवडणुक वीस ते पंचवीस वर्षापासून झालीच नाही ! तर विदर्भ साहित्य संघाच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी जाहिर करण्यात आली आहे. तर या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून यामध्ये १११ सदस्यांनी अर्ज भरलेले होते त्यापैकी काहींनी मागे घेऊन सदस्य पदासाठी ८३ उमेदवार रिंगणात उभे आहे आणि अध्यक्षपदासाठी अकरा उमेदवारांनी अर्ज भरलेले होते ते काहींनी मागे घेऊन सध्या रिंगणात आता 5 अधिकृत उमेदवार अध्यक्षपदासाठी उभे आहेत.

विदर्भ साहित्य संघाची निवडणुक येत्या १५ मार्च २०२६ रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या मैदानात चार पॅनल आणि अध्यक्ष पदासाठी ५ अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत. त्यातील अध्यक्ष पदासाठी अधिकृत ५ उमेदवारांनी अर्ज भरलेले आहे. त्यापैकी गिरीश गांधी, प्रदीप दाते, श्रीपाद भालचंद्र जोशी, रंजन दारव्हेकर आणि डॉ. रवींद्र शोभणे हे अध्यक्षपदी रिंगणात आहेत.

याबाबत माहिती देण्यासाठी डॉ. रवींद्र शोभणे यांनी परिषदेत माहिती दिली. डॉ. रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेत टिळक पत्रकार भवन येथे बुधवारी पत्रपरिषद पार पडली. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज हा पॅनल निवडणुकीत खंबीरपणे उभा असून आमच्यासोबत चाहत्यांचा आशीर्वाद मतदारांचे पाठबळ आहेत. त्यांचा आशीर्वाद आहे आणि आमच्या पॅनलला सर्व उमेदवारांनी निवडून द्यावे. असे डॉ.रवींद्र शोभणे यांनी पत्रकार परिषदेत आवाहन केले आहे. यावेळी मंचावरील उपस्थित अध्यक्षपदी उमेदवार असलेले डॉ. रवींद्र शोभणे सोबतच, डॉ. विशाखा कांबळे, संजय भाकरे, बळवंत भोयर, सलीम शेख, संजय तिजारे आणि श्रीकांत पवनीकर यांची मंचावरील उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे