
0
6
3
9
6
0
दिवाळी
दूर होतो अंधार
काळीज आनंदे हसते
भरून येतं मन
चमक डोळ्यात दिसते..
उजळतात दीप कसे
अन् कशी नवलाई होते
नातवंडांच्या बागडण्याने
अंगणात रोषणाई येते..
किती किती बोलावं
मनं गप्पांमध्ये रंगतात
हास्यकल्लोळ असा
वाटे फटाके वाजतात..
चिंब झालेल्या मनाला
अभ्यंगस्नानाची जोड
दिवाळीच्या फराळापेक्षाही
क्षण हे अति गोड…
दिव्यांपेक्षाही मन तेजाने
उजळून निघते..
अंगणातील रांगोळीपेक्षाही
प्रसन्न होऊन हसते..
लेकरांत मिरवण्याचे
सुख भाळी असते..
अंतरंग उजळवणारी..
मायेचे क्षण देणारी..
वर्षातून चार दिवस
खरंच दिवाळी असते..
स्वाती मराडे-आटोळे
ता.इंदापूर, जि. पुणे
========
0
6
3
9
6
0



