0
4
8
2
9
4
प्रश्नच पडला?
का अशी का तशी
लोकं सारी वागतात कशी
एक बोलले दुसराच अर्थ
मनात मात्र गहरा स्वार्थ
खुंटते विचारपातळी जिथे
पाताळयंत्री सुरूवात इथे
चालतात कशी यांची डोकी
एक डाव ते नक्कीच राखी
शब्दास शब्द असतो तयार
विचारांचे लपवलेले भूयार
सोडून सारी माणूसकी
तोडतात पटकन नातीगोती
मनी कुटिलता गोड बोलती
स्वतः सारखे झाले तरच सोबती
कोणाशी आपण वागावे कसे
सरळमार्गीचे ते काम नसे
प्रेमाचे होईल कधी हसे
चलत्याचाच हात हाती असे
आयुष्य भराची संगत सोबत
सोडून जातील हसत खेळत
प्रामाणिकपणा नेहमीच नडला
असे कसे बरे प्रश्नच पडला?
शर्मिला देशमुख -घुमरे, बीड
0
4
8
2
9
4



