
0
5
9
0
3
4
नाते मैत्रीचे
बंधन कशाचे निस्वार्थ हात
मित्र नको आतल्या गाठीचा
येता प्रसंग कठीण देई साथ
नको दुरावा कधी असे गोडवा मनाचा
जसे कृष्ण सुदाम्याचे नाते
राम हनुमान ह्रदयात वसे
प्रेम जिव्हाळा माया ममता
अशीच घट्ट मैत्री कायम असे
जीवनात आले किती अडचनी
अडचणीवर करूया मात
दोघेही मित्र सोबतीने
संघर्षाला तोंड देऊ आनंदात
भावनांच्या बागेमध्ये
हातात हात घेत फिरू
आयुष्यही सोपे करू
आपली देतील उदहारणे तरू
आनंदामध्ये साथ सोबत
तशीच जपू मैत्री दुःखातही
वाळवंटातही पाण्याची साथ
अशीच कायम मैत्री दोघातली
कुसुमलता दिलीप वाकडे
दिघोरी रोड, नागपूर
0
5
9
0
3
4



