0
4
8
2
9
3
विध्वंसक
मूळ स्वभावात तुझ्या
कर सुधारणा थोडी
नाही तर नाही चालणार
तुझ्या जीवनाची गाडी
माणुसकी असू दे तुझ्यात
आदर कर दुसऱ्याचा
त्यानेच मिळेल समाधान
कर विकास स्वतःचा
स्वभावात बदल करून
हित जपावे दुसऱ्याचे
विध्वंसक वृत्ती असूच नये
ह्याने भले झाले कुणाचे ?
मनाला ठेऊन शांत
विचार करा विवेकाने
चुका जरी झाल्या तरी
बदला घेऊ नये सूडबुद्धीने
तो एक मानव असतो
प्रथम आदर कर त्याचा
संसार हा सर्वांचाच असतो
कायापालट कर जीवनाचा
केवलचंद शहारे
सौंदड,जि.गोंदिया
=======
0
4
8
2
9
3



