Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकोकणक्रिडा व मनोरंजनरायगड

जे. एस. एम. महाविद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 6 7 9 8 3

जे. एस. एम. महाविद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज नेटवर्क

अलिबाग (दि.२६/११/२०२६): राज्यशास्त्र विभागाच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी जे एस एम महाविद्यालयामध्ये सकाळी ९:oo ते १०:३० या वेळेत ” भारतीय संविधानाचे तात्विक अधिष्ठान व समकालीन आव्हाने ” या विषयावर डॉ.प्रा.भगवान लोखंडे, डी . जी. तटकरे कॉलेज ,तळा, जिल्हा – रायगड ,यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमास ७० विद्यार्थिनी आणि ३१ विद्यार्थी व ५ प्राध्यापक उपस्थित होते .

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य डॉ.प्रा. प्रवीण गायकवाड यांनी भूषविले. या कार्यक्रमास जनता शिक्षण मंडळाचे मा. अध्यक्ष अॅड. डाॅ. गौतम पाटील तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ सोनाली पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ.प्रा.प्रवीण गायकवाड यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रा.आय.पी कोकणे यांनी संविधान दिनाचे महत्त्व आणि त्या संदर्भात महाविद्यालयाची भूमिका समजावून सांगितली.

डॉ.प्रा.भगवान लोखंडे यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय संविधानाच्या तात्विक अधिष्ठानाची सखोल मांडणी करून सद्य परिस्थितीत संविधानापुढे कोणती आव्हाने आहेत,याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ.प्रा.पंकज घरत यांनी केले. या कार्यक्रमास प्रा.मोनिका पाटील, श्री.राम रोकडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 7 9 8 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे