Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजननवी दिल्लीनागपूरपरीक्षण लेखब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रमुंबईराजकियविदर्भ

“महाराष्ट्राचे देवाभाऊ, देवाभाऊंचा महाराष्ट्र”; डॅा अनिल पावशेकर

ज्येष्ठ स्तंभलेखक, नागपूर

0 4 8 2 8 2

“महाराष्ट्राचे देवाभाऊ, देवाभाऊंचा महाराष्ट्र”; डॅा अनिल पावशेकर

ज्येष्ठ स्तंभलेखक, नागपूर

बिनधास्त न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल हाती आले असून भाजपच्या सुनामीत विरोधकांचा पालापाचोळा झाला आहे. आमचाच ब्रॅंड म्हणून गाजावाजा केलेल्यांचा जनतेने बॅंड वाजवला असून महाराष्ट्राचा एकमेव ब्रॅंड म्हणून देवेंद्रजींच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. एकतर तू राहशील किंवा मी राहील याचा फैसला जनतेने केला असून भाजपच्या विकासाच्या धोरणाला जनतेचे भरभरून प्रेम मिळाले आहे.

झाले काय तर यावेळी निवडणूका जरी स्थानिक स्तरावर, प्रश्नांवर आधारित असल्या तरीही त्याला कुठे ना कुठे तरी राष्ट्रीय स्तरावरील घडामोडींची किनार होती. याचीच चुणूक मग निकालात दिसली आहे. ॲापरेशन सिंदूर हा देश, सैन्याच्या अस्मितेचा मुद्दा होता आणि याच अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर विरोधकांनी शेण खाल्ले. भाजप आणि पंतप्रधानांचा विरोध करता करता विरोधकांनी चक्क देश सैन्याविरूद्ध गरळ ओकून जनतेची सहानुभूती गमावली होती. ज्यांना ज्येष्ठ श्रेष्ठ समजले जायचे अशा प्रुथ्वीबाबांनी सुद्धा ध्वनिप्रदूषण करून आगीत तेल ओतले होते.

त्यातच कधीकाळी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सेनेने आमचे हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही असे म्हणत उरलीसुरली कसर पूर्ण केली. केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे जनतेच्या मनावर पक्के कोरले गेले असल्याने त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणे किती भारी पडू शकते हे या निमित्ताने दिसून आले आहे. खरेतर ही निवडणूक म्हणजे सबकुछ देवेंद्रजींचा वन मॅन शो होता आणि त्यांनी आपल्या दणदणीत कामगिरीने ते सिद्ध केले आहे. वास्तविकत: २०१४ पासूनच देवेंद्रजींनी आपला राजकीय प्रभाव दाखवून दिला होता परंतू कधी स्वकीय तर कधी परकीयांनी त्यांच्या मार्गात खोडा घातला होता.

या निवडणुकीत सर्वांचे डोळे लागले होते ते मुंबईकडे. हा बालेकिल्ला जोपर्यंत सर करत नाही तोपर्यंत महाराष्ट्र जिंकला असे समजले जायचे नाही आणि इथेच देवेंद्रजींचा खरा कस लागला. गेली २५ वर्षे सेनेच्या ताब्यात असलेले हे संस्थान खालसा करणे हे वाटते तितके सोपे काम नक्कीच नव्हते. मात्र ज्याप्रकारे राज्यसभा, विधानपरिषद, विधानसभा निवडणुकांत देवेंद्रजींनी विजयश्री खेचून आणली होती त्याच हुशारीने मुंबईत विजय मिळवला आहे.

कधीकाळी यशाचा महामंत्र असलेली युती स्व. बाळासाहेबानंतर पोरकी झाली. सेना भाजपच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी, “तुझं माझं जमेना तुझ्या विना करमेना” असं झालं होतं. २०१४ पासून सेनेचे राजीनामे खिशात तयार होते, जे बाहेर यायला २०१९ उजाडावे लागले. अर्थातच ही दगाबाजी देवेंद्रजी कसेकाय विसरतील? मग त्यांनी सेना राष्ट्रवादीचे अंडे आतून फुटायची वाट बघितली आणि पुढचा घटनाक्रम सेना (उबाठा) राष्ट्रवादी (श.प गट) पक्षासाठी मृत्यूघंटा ठरली.

वास्तविकत: देवेंद्रजींच्या झंझावातापुढे विरोधक पुरते नामोहरण झाले होते. परंतु आपली चूक मान्य करतील तर ते विरोधक कसले. सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पैशाचा महापूर, ईव्हीएम घोटाळा, वोटचोरी आणि यावेळी तर शाई पुसली, शाई मिटलीचे रडगाणे सुरू केले. सोबत मराठी मिडीयाने जणूकाही भाजपविरोधी सुपारी घेतल्या सारखे नसलेल्या ब्रॅंडची हवा दाखवण्याची प्रयत्न केला होता. मात्र जनतेने हा खोडसाळपणा पुरता ओळखला होता. दुष्ट राजकारण आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या विरोधकांना जनतेने नाकारले.

आजच्या घडीला देवेंद्रजींच्या उंचीचा एकही नेता महाराष्ट्रात दिसत नाही. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास, सर्वसमावेशक धोरण, मनात कोणतीही कटुता न बाळगता राज्याची भरभराट कशी होईल याचा ध्यास घेतलेले, विकासाची कास धरणारे देवेंद्रजी म्हणूनच इतरांपेक्षा उजवे ठरतात. भलेही त्यांच्यावर कितीही वैयक्तिक टीका झाली असली तरीही त्यांनी विरोधकांवर कधीही पातळी सोडून प्रत्युत्तर दिले नाही. टीका करणाऱ्यांना आपल्या कामाने, कर्तृत्वाने उत्तर देणारे देवेंद्रजी आज तथाकथित मुंबई किंग ला हरवून महाराष्ट्र किंग ठरले आहेत. थोडक्यात काय तर महाराष्ट्राचे देवाभाऊ आणि देवाभाऊंचा महाराष्ट्र असे म्हटले तर ते वावगे ठरू नये.

दिनांक १७ जानेवारी २०२६
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे