ई-पेपरकवितानागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेसाहित्यगंध
पाऊस बरसला चोहीकडे
पांडुरंग एकनाथ घोलप ता.जुन्नर जि.पुणे
0
4
8
2
8
7
पाऊस बरसला चोहीकडे
पाऊस बरसला चोहीकडे
सुखावली ही धरणीमाता
कृपादान झाले मेघराजा
उरली ना भय चिंता ..१
परिसर नटला आनंदाने
परिधान केला शालू नवा
पसरली चारही दिशांना
मंद धुंद ही कुंद हवा ….२
मशागत करून आनंदला
शेतात राबणारा शेतकरी
मिळेल आता सुखाची
सार्यांना पोटभर भाकरी ….३
खळाळत्या नदी नाल्यांचे
कानी गुंजले मधुर सूर
ओलिचिंब झाली अवनी
आनंदाने भरला ऊर ….४
पाऊस बरसला चोहिकडे
नटली सौभाग्यशाली सृष्टी
अशीच राहू दयाघना
आम्हा सगळ्यांवर कृपादृष्टी….५
पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर जि.पुणे
0
4
8
2
8
7



