Breaking
कविताकोकणनागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भसाहित्यगंध

परीसस्पर्श पांडुरंग एकनाथ घोलप ता.जुन्नर,जि.पुणे

0 4 8 3 0 1

परीसस्पर्श

आयुष्याचे सोने झाले अवघ्या
मायबापाचा होता परीसस्पर्श
संघर्षमय सारे जीवन होते
सुखावले आज भरला हर्ष

मायेचा अखंड निर्झर होता
तेच दयेचा अथांग सागर
मायबापच खरे माझ्यासाठी
होते सर्व सुखाचे आगर

सुसंस्कारांचे वरदान दिले
कष्टाळू त्यांच्या हातांनी
शिक्षणाची संधी लाभली
त्यांनीच पेरलेल्या स्रोतांनी

हवे नको ते सारे पाहिले
ना राहिली कोणती उणीव
उनपावसातील त्यांच्या कष्टाची
मला आजही आहे जाणीव

आठवण आजही येते जेव्हा
त्यांचाच परीसस्पर्श मज होतो
सोन्यासारख्या माझ्या आयुष्याला
पुन्हा नवीन चकाकी देतो

पांडुरंग एकनाथ घोलप
ता.जुन्नर,जि.पुणे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 1

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे