0
4
8
2
9
7
माझी पाककला
मसाला पनीर
साहित्य: १००ग्रॅम किसलेले पनीर, अर्धी वाटी कांदा, खोब-याचे वाटण, लाल तिखट दोन चमचे, हळद एक चमचा गरम मसाला, अर्धी वाटी चिरलेली कोथींबीर, चवीनुसार मीठ, दोन मोठे चमचे तेल,आले लसूण पेस्ट एक चमचा, थोडी कसुरी मेथी, एक ग्लास पाणी.
कृती: कढईत तेल घालून गरम झाल्यावर त्यात आले लसूण पेस्ट घालून चांगले परतावे.नंतर त्यात कांदा खोबरे वाटण घालून तेल सुटेपर्यंत होऊ द्या.लाल तिखट,हळद,गरम मसाला ,पनीर कीस घालून परतावा.मीठ घाला,एक ग्लास गरम पाणी घालून मंद आचेवर होऊ द्या.कोथिंबीर पेरून पोळीसोबत खायला द्या.
मीनाक्षी काटकर
दारव्हा यवतमाळ
========
0
4
8
2
9
7



