महायुतीच्या उमेदवारांना मुस्लिम समाजानेच आणले अडचणीत
वंचित शून्य व बसपाही शून्यच
महायुतीच्या उमेदवारांना मुस्लिम समाजानेच आणले अडचणीत
वंचित शून्य व बसपाही शून्यच
नागपूर: महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम समाजाने अनेक ठिकाणी ठरवून भाजपच्या आणि महायुतीच्या विरोधात मतदान केल्याचे दिसून येत आहे. तसेच राज्यात वंचित बहुजन आघाडी शून्यावर तर बहुजन समाज पार्टीही शून्यातच असल्याचे उघड झाले आहे. सोलापूर किंवा धुळे असो, पुणे असो संभाजीनगर असो किंवा उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघ असो या आणि आणखी बऱ्याच ठिकाणी महाविकास आघाडीला मुस्लीम मतदारांनी पसंती दिल्याचे दिसत आहे.
उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी ईशान्य मुंबई मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी भाजपच्या उज्वल निकमांचा पराभव करत मोठा विजय मिळवला. या ठिकाणी उज्वल निकम यांच्यासारखा प्रखर देशभक्त आणि तगडा उमेदवार देवून देखील भाजपच्या पदरी निराशा पडली.





