Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननागपूरपश्चिम महाराष्ट्रपुणेब्रेकिंग

पुण्याची ‘राधिका रिक्षावाली’

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

0 4 8 2 8 2

पुण्याची ‘राधिका रिक्षावाली’

वसुधा नाईक, पुणे प्रतिनिधी

पुणे (दि १८ नोव्हे. ): मला सारसबागेजवळील कल्पना हॉटेलला जायचं होतं. तिथे डॉक्टर घाणेकर यांच्याबरोबर मीटिंग ठरली होती. मीटिंगची वेळ सकाळची दहा अशी ठरली होती. पण घरातल्या कामामुळे मी दहा वाजून पाच मिनिटांनी घराबाहेर पडले.

एरवी गेटमधून बाहेर पडले की मला रिक्षा मिळते. मी राहते विणकर सभागृहजवळ.पण काल रिक्षा मिळाली नाही. पुणे- सातारा रोडला पुष्पा टॉवर्स येथे मला एक रिक्षा मिळाली. रिक्षाचालक पुरुष नसून स्त्री होती. मी प्रथमच स्त्री रिक्षाचालक यांना रिक्षा चालवताना पाहत होते. मला खूप आश्चर्य वाटले. आणि माझा पहिला प्रश्न तुम्ही कधीपासून रिक्षा चालवत आहात. नाव काय आपले? त्यांनी सांगितले सहा महिने झाले.नाव त्यांचे राधिका पुजारी.

माझा पुढील प्रश्न असा होता की तुम्ही किती वाजता घरी जाता? त्यांनी सांगितले 8 नंतर… मग मी जरा शांत झाले.कारण हल्ली आपल्याला माहित आहे अन्याय, अत्याचारला बऱ्याच बायका बळी पडत आहेत.परत विचारले रिक्षा चालवण्याचा आपला अनुभव कसा आहे? मग त्यांनी सांगितले की अनुभव आत्तापर्यंत चांगला आहे आणि जर मला काही वाटले तर मी त्या प्रवाशाला मध्येच उतरवते.

मला जे विचारायचे होते त्या रिक्षावाली राधिकाला समजले आणि मलाही त्याचे उत्तर मिळाले. ती कुठे राहते हे विचारल्यावर समजले की ती कात्रजला आमच्याच एरियात राहते. मला नेहमी रिक्षा हवीच असते.तिला विचारले येशील का मी बोलवीन तेंव्हा यावर ती हो म्हणाली.मला आनंद झाला. मग तिला विचारले मला परत घरी जायचे आहे तर अर्धातास कल्पना हॉटेल जवळ थांबणार का? राधिका हो म्हणाली.

डॉ. घाणेकर सर आणि आमची मिटिंग झाली. आम्ही बाहेर आलो तर राधिका वाटच पहात होती. डॉ. घाणेकरांनी तिला पाहिले आणि विश्वजोडो अभियानांतर्गत आम्ही दोघांनी राधिकाचा सत्कार केला. तिला युवा क्रांतिबद्दल माहिती दिली. राधिकाही खूप आनंद झाला. तिने आम्ही दोघे तिच्या रिक्षात बसलो तेंव्हा मस्त आमचा सेल्फी घेतला

एक नवा अनुभव
एक नवी ओळख
एक नवे बंध जपले
एक नावे नाते जमले…

5/5 - (2 votes)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे