बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील चारोळ्या
मुख्य प्रशासक राहुल पाटील
*वैभवशाली*
*गाडून सुलतान शाह्या*
*उभारलं माझं स्वराज्य*
*वैभवशाली इतिहासाचे*
*राजे शिवबांचे हे सुराज्य*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*चारोळी –वैभवशाली*
संताच्या पावन स्पर्शाने
पवित्र झालीय इथली माती
सूसंस्कार, साहित्याने नटलेला
वैभवशाली माझा महाराष्ट्र प्रतापी.
*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*वैभवशाली*
साऱ्या जगात उभा प्रौढीने
देश भारत वैभवशाली
दिसते उठून सर्व भाषेत
माझी मराठी माय माऊली
*दिनकर झाडे, गडचांदूर*
*©जि. चंद्रपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*वैभवशाली*
धनसंपत्ती कूच कामी
नाती गोती जपू मनोमनी
वेळ प्रसंगी एकत्र येऊ
वैभवशाली आम्ही त्या क्षणी
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*वैभवशाली*
पहावया वैभवशाली महाराष्ट्र
मन करा उदात्त
चाललेय कारखाने परराज्यात
आपण बसलोय शांत
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहमदनगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*वैभवशाली*
*संतांची वैभवशाली परंपरा*
*आई मनापासून पाळायची,*
*निरंतरपणे संस्कारांना खरं*
*जीवनात सुंदरच माळायची.*
*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*४,शारदानगर,चोपडा*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*वैभवशाली*
वैभवशाली परंपरा होती
आपल्या महाराष्ट्राची,
नरणारी जगती आनंदाने
फळे चाखी समाधानाचीं.
*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️
*वैभवशाली*
वैभवशाली इतिहासाची
सुर्वणभूमी सह्याद्री शिखर…
नवयुगात ही शिवबांच्या वीरतेची
साक्ष देण्या उभा निरंतर..
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️⚜️????⚜️♾️♾️♾️♾️



