ई-पेपरकवितानागपूरमराठवाडासाहित्यगंध
सावित्रीच्या लेकी

0
4
0
9
0
3
सावित्रीच्या लेकी
दूर्जनांचा कर्दनकाळ
आम्ही सावित्रीच्या लेकी,
क्रांतिज्योती माय आमची
आणू,नाठाळाच्या नऊ नाकी.
नाही सोसायचा आता
अन्याय अत्याचार,
जिणं नको अबलेचे
सबला होवून, करू वार.
आपल्या ज्ञानविचाराने
सर्वच क्षेत्रे काबीज करी,
ज्योती सावित्रीची लेक
सर्वं जगाला,आज भारी.
आकाशाला गवसनीं घालून
ध्येय आपले, पूर्ण करते,
अहंमपणा दूर ठेवून
स्वतःला सिद्ध करते.
जे नहुते आमच्या नशिबात
तें, सुख वैभव आज भोगतो,
तुझ्यामुळे, किंमत कळली
असे जग अभिमानाने म्हणतो.
मायादेवी गायकवाड
मानवत परभणी
==============
0
4
0
9
0
3





