बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धेतील विजेत्यांच्या कविता
मुख्य संपादक राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*????विषय : अंधुकशी आशा????*
*????बुधवार : ०९ / १० /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*अंधुकशी आशा*
मी अजूनी तिथेच उभा
जिथून गेलीस तू निघून
एक अंधुकशी आशा तू
पुन्हा येशील मागे फिरून .. //
जाशील तरी किती पुढे
अडशील माझ्यावाचून
विश्वास आहे माझे प्रेम
तुला आणेल मागे खेचून.. //
तुझे अचानक रागावणे
नव्हते मुळीच मनातून
खात्री आहे मला तू ही
दुखावली आहेस आतून.. //
मला विसर म्हणताना
का बघत होतीस वळून
उसने अवसान तेव्हाच
तुझे पडले होते गळून.. //
तुझ्या वरवरच्या द्वेषात
सत्य राहील कसे लपून
तुला तुझ्यापेक्षा जास्त
सखे मी आहे ओळखून.. //
शापीत शरीर सौंदर्याचे
सारे सत्य आहे जाणून
टाळते आहेस ना मला
फक्त अल्पायुषी म्हणून.. //
निक्षून सांगतो ऐक सखे
अंधूकशी आशा ठेवून
मीच जिवंत ठेवीन तुला
एक किडणी दान देवून.. //
कशाला हव्या दोन मला
एकावरच घेऊ चालवून
सोबत राहू सोबत जाऊ
मृत्यूलाही थोडे थांबवून.. //
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
*कुणी ठेवी पाठीवर,आधाराचा हात पाठी…*
*अंधुकशी आशा जागे,बने आंधळ्याची काठी…धृ*
अंधारल्या जीवनात,टोपलीभर निराशा…
अंधकार मिटविण्या,येई धावून हो उषा…
*थोडा मदतीचा हात,असो दुर्बला संगाती…१*
*अंधुकशी आशा जागे,बने आंधळ्याची काठी…*
येती आणि जाती कैक, दुःख देऊन वादळे…
एकामागे एक असे, येऊन सदा आदळे…
*त्या वादळांना सांगा हो, घ्यावे सामावून पोटी…२*
*अंधुकशी आशा जागे,बने आंधळ्याची काठी…*
डोळ्यातले स्वप्न बघा,कसे डोळ्यात विरले…
ओंजळीतले दाणे ते,ओंजळीतच सरले…
*दोष देण्या शब्द कधी,उमटले नाही ओठी…३*
*अंधुकशी आशा जागे,बने आंधळ्याची काठी…*
माझे माझे करतांना, गेले सारे काही वाया…
कधी त्यांना विणवले,कधी पडलोय पाया…
*त्या पायात “सुधाकरा”, प्रभूचे दर्शन होती…४*
*अंधुकशी आशा जागे,बने आंधळ्याची काठी…
*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
असते मनात खोलवर
अंधुकशी आशा लपलेली
हळव्या भाव भावनांची
स्वप्नांची दुनया जपलेली…
जशी देठात लुप्त कळी
फुलण्यासाठी आसुसलेली
तशीच एखादी कल्पना
अंतर्मनात असते आतुरलेली..
चालताना वाट भारी असते
व्यापलेली गर्द काळोखात
धीराने पुढेच सरसावण्याची
सुप्त इच्छा असते काळजात
वाटेवर असोत कित्येक काटे
ही वाट कधी ना कधी सरेल
अश्रूंचे पाट वाहे डोळ्यावाटे
मात्र अंधूकशी आशा तारेल…
अंधारामध्ये एक धूसरं किरण
काजवा जसा अंधार छेदतो
तसेच असावे आपले जगणे
मनी चैतन्याचे बगीचे फुलवतो
आयुष्याचे क्षण क्षण वेचता
जीवन एक चित्रपट वाटतो
क्षितिजामागून क्षितिज गाठता
मागे वळून कोण पाहतो..?
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
अंधुकशी आशा मनाची
जगायला तिने शिकवले
लबाडांच्या दुनियेत सुद्धा
सत्य शेवटपर्यंत टिकवले…!!
जीवनात कुट्ट काळोखाने
तेजस्वी सूर्याला झाकलेले
क्षणार्धात काजव्याने येऊन
साऱ्या अंधाराला फाकलेले…!!
जेव्हा जेव्हा वीज गेली
कंदीलाने प्रकाशित घर
डोळ्यांचे अश्रू लपविण्या
ढगातून उतरली एक सर…!!
जीवनात जेव्हा सुरु झाले
जीवघेणे वळण,उंच घाट
थोडे अंतर पार करताच
आल्हाददायी मैदान सपाट …!!
संकट दुःख संघर्ष जीवनात
हातात हात घालूनी हजर
वेळ नाही थांबत एकाजागी
रोज सांगतो घड्याळात गजर..!!
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षीका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
तेच आपले स्वप्न सारखे कुरवाळतो आहे
झाल्यात ज्या चुका त्या टाळतो आहे
त्या विरहातील जखमा वाटतात मज सुगंधी
आठवणीत तुझ्या, त्या डायरीचे पान चाळतो आहे
कधी कधी वाटतो तो एकांत मज नकोसा
मग ऐकता प्रेमगीतही मी चवताळतो आहे
वाजता पाचोळा ही चाहूल तुझीच होते
आभास हा समजताच आसवे गाळतो आहे
तू येशील परत, का एक अंधुकशी आशा
मग मी स्वतःला उगाच सांभाळतो आहे
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
विना काम, फुकट दाम!
जिकडेतिकडे सुरू गोंधळ…!
निवडणुकीच्या तोंडावर,
पैशाची झाली चंगळमंगळ..!
लाडकी बहीण नेत्याची
बँकामध्ये मारते चकरा. !
लालपरी अर्ध्या तिकीटात
उठविते बहिणीचा नखरा.!
सुविधांचा झाला सुळसुळाट!
सवलतीचा वाहतोय पाट..!
फिस माफीच्या भरवशावर,
मुलींचाच वाढलायं थाट..!
नाही कामाला कीमंत मुळी!
नाही राहिला गुणाला भाव!
लाॅलापाॅप दिसतोय सर्वत्र
रचलाय फुकटखाऊचा डाव..!,
विसरलो आम्ही स्वावलंबी धडे!
नाही राहीला स्वाभिमान.. !
जिकडे मिळतोय पैसाअडका
तिकडेच गहाण मानपान..!
देशहिताचा भाव आज
मनात कुणाच्या वसेना..!
अंधुकशी आशा बदलाची,
इथे दुरवर कुठेही दिसेना!
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
रुप आगळे उजळले
तेज चंद्र किरणांचे
रुप कनक सूर्याचे
सौंदर्य चेहरावरी खुलले
गुलाबी गोरी सुंदर
नेसली साडी भरजर
पैंजण पायी रुणझुण
वाजती जोडवी खणखण
आनंद अती आई-बापास
सुकन्या आली दिवाळीसणास
गप्पाटप्पानी घर दुमदुमले
भिंतींनीही कान टवकारले
निरोप धाडला पाडव्यास
राजस जावईबापू सुकुमारास
येणार नाही ना कळवलं
काळ गेला सर्व चिंतीत
उदरी वाढत होता नवअंकुर
सभोवती दाट सुखाची रास
जीवन वाटे सुन्नं भकास
उदासीन जीवन प्रवास —
रक्षणकर्ता न राहिला आधार
आकाशातले तारे मोजत
दिवस एकेक होती कंठीत
अंधुकशी आशेवर होती जगत
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहमदनगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
विणलेले हे जीवन आहे
सुख दुःखाच्या धाग्यांनी
अंधुकशी आशा मनाची
तरी तेजाळते प्रकाशांनी
अंधारल्या राती अचानक
उजेड द्यावा काजव्यानी
काळोखात प्रखर प्रकाश
संकटकाळी जणू धावुनी
तमा न वाटते अंधाराची
स्वप्रकाश हा काजव्याचा
दिपवून टाकील नजरांना
बदले दृष्टिकोन बघ्याचा
अंधुकशी आशा आजची
ही प्रखर तेजाने झळकेल
आयुष्याला अर्थ ही येईल
नशिबाचेही स्टार चमकेल
साधा ध्येय आपल्यापरी
अथक परिश्रम,प्रयत्नाने
करूनी मात संकटावरती
अधीन आशादायी वृत्तीने
शून्यातून विश्व निर्मिलेली
घ्यावीत उदाहरणे दाखले
कार्यकर्तृत्व आदर्श ठेवून
जीवन घडवावे आपापले
*✍️बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
काय करू काय नाही
सुकली नाही जिवनाची शाही
सुकलेले आहे माझे मन
नाही मिळाला मला सकून
व्यापले आहे सारे जग
दिसत नाही पुढची वाट
अंधकारात लीप्त झाली
नाही राहीला शाही थाट
मनात सजविले आहे तिला
बघितले तिला हृदयातून
निर्धार केला मी लग्नाचा
सारेच गेले मला सोडून
नाही राहीली आता मनिषा
फक्त उरली अंधुकशी आशा
कातरवेळ गेली निघून
नाही लागत माझे मन
कां जगावसं वाटतोय मला?
अजुनही आहे की आशा !
मनात जे होते सजले
त्यांचीच तर झाली निराशा
यश अपयश हे नैसर्गिक
कोण जाणतो ह्या गोष्टीला
प्रत्येक मन हे वेगवेगळे
कां गुंतवू आपल्या मनाला ?
जिवन हे क्षणभंगुर आहे
उरली फक्त अंधुकशी आशा
काजव्यांचा तो अल्पशा प्रकाश
बघून होणार कां माझी निराशा!
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
अंधुकशी आशा आता
चित्र सौराष्ट्राचे बदलेल
रणसंग्राम अडचणींचा
कायमचाच हा थांबेल
घरदार, रस्ते, विद्यालये
मुली असतील सुरक्षित
स्त्रियांप्रती सजग होईल
समाज दृष्टी संकुचित
सरकारला ऐकू येईल
सार्थ मागण्यांची हाक
शेतकऱ्यांसवे मजुरांचे
सुरळीत चालेल चाक
वाढत्या महागाईसाठी
रोजगार ठरेल उपयोगी
यशाचे शिखर गाठतील
हात युवकांचे उद्योगी
स्वच्छ, सुंदर निसर्गाचे
नागरिकांस असेल भान
हळव्या भावभावनांचे
ओलसर दिसेल पान
मानवतेची कास धरून
संबंध होतील पूर्ववत
लहानथोर साऱ्यांकडून
वर्तन घडेल आदर्शवत
*मीता नानवटकर नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ५.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖