बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*????विषय : अंधुकशी आशा*????
*????बुधवार : ०९ / १० /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*अंधुकशी आशा*
*अंधारल्या जीवनाला*
*दाखवली मित्राने दिशा*
*त्याच्यामुळेच जगण्याची*
*वाटते अंधुकशी आशा*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
सर्व काही संपले वाटते
संकटात खोल बुडताना
अंधुकशी आशा उरतेच
तरी धीर सारा सुटताना
*सौ.संगीता पांढरे*
*इंदापूर, पुणे*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
जगण्याचे बळ
अंधुकशी आशा
आयुष्यात काळोख
मनातली निराशा
*डॉ.सौ.मंजूषा साखरकर, ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
नैराश्येच्या अंधःकारात
हतबल होतो माणूस जेव्हा
एक अंधुकशी आशा देते
जगण्यासाठी बळ तेव्हा
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
संसाराच्या पायी
कशी रे अभिलाषा
ओढून हा गाढा
अंधुकशी ही आशा…
*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
मृत्यू शय्येवरील व्यक्तीला
अंधुकशी आशा, जगण्याची असते,
कासावीस होवून,वाट पाहतो
नजर मात्र, लेकरांना शोधत असते.
*मायादेवी गायकवाड मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
जीवन-प्रवास खेळच हा न्यारा
कधी अंधुकशी आशा तर निराशा
निस्सीम प्रेम, जगण्याची आकांक्षा
हीच खरी आहे आयुष्याची परिभाषा
*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
फिरायला गेल्यानंतर
मला ती कायम भेटायची….
ती माझी मैत्रीणच असावी अशी
मला अंधुकशी आशा वाटायची….
*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
अपयशाचे धुके पसरले जीवनी
लांब दिसे धूसर,अंधुकशी आशा….
कष्टरूपी सोनेरी सूर्य किरणांनी
उजळून निघू दे यशाचा दाहीदिशा…
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*अंधुकशी आशा*
सुख, समृद्धी, स्वास्थ बिघडता
जीवनी येते घोर निराशा
निराशेच्या गर्त शर्वरीतूनचं
येते नवं उमेदीची अंधुकशी आशा.
*सौ. इंदू मुडे, ब्रम्हपुरी, चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????⚜️????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ५.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖



