
0
6
1
1
8
5
पळती झाडे
गाडी लागली पळायला
झाडे पण लागली पळायला
चिंटूनी म्हटलं ए थांबा थांबा
झाडोबा का पळता लांब लांब
आंबा म्हणाला नाही पळत
आम्ही तूच पुढे पुढे सरकते
चिंच म्हणाली हसत हसत
भरभर करत गाडी पळते
खिडकीतून चिंटू बघत होता
झाडे मागे मागे पळत होती
शेत, घर, डोंगर सारेच कसे
माझ्याशी लपंडाव खेळत होती
आई म्हणाली चिंटू बाळा
झाडे नसतात रे पळती
गाडी आपली पुढे धावते
म्हणून जग मागे सरकती
मी हसले, झाडं पण हसले
गाडी पण खळखळ हसली
पळती झाडे पाहतांना
मला खूप खूप मजा आली
प्रतिमा नंदेश्वर
ता. मूल, जि.चंद्रपूर
0
6
1
1
8
5



