कवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध
चितपट; सविता धमगाये

0
4
0
9
0
3
चितपट
आयुष्याचा खेळ न्यारा
कधी चित तर कधी पट
हसत खेळत राहू
कशाला हवी चितपट
एकेक काडी जमवून
लावू आपल्या घराला
सुखदुःखाचे तोरण
बांधून घेऊ दाराला
पाहुण्या राऊळ्या सारखे
येता संकटाना देऊ हुल
मुक्काम जर वाढलाच कधी
थंड नाही राहणार चूल
भांडण तंटा झालाच जर
गुमान नाही राहायचं
थोड तुझं थोड माझं
बोलून मोकळं व्हायचं
चिल्ली पिल्ली मोठी होतील
पंख फुटताच उडून जातील
शेवटी आपण राहू दोघेच
दिस पाखरासारखे उडतील
सविता धमगाये, नागपूर
==============
0
4
0
9
0
3





