बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये गरजू विद्यार्थीनींना सायकलीचे मोफत वाटप
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवासमध्ये गरजू विद्यार्थीनींना सायकलीचे मोफत वाटप
तुषार थळे, अलिबाग प्रतिनिधी
अलिबाग: सन २००० मध्ये भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले ‘द थिएटर ग्रुप मुंबईचे’ संस्थापक अॕलेक पदमसी यांनी अनेक इंग्रजी व हिंदी नाटकातून भूमिका साकारल्या आहेत. तसेच अनेक जाहिराती आणि काही चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी भुमिका साकारल्या आहेत. गांधी चित्रपटात त्यांनी मोहम्मद अली जिना यांची भुमिका साकारली आहे. त्यांचा आवास येथे फार्म हाऊस आहे.
ॲलेक पदमसी हे अनेक वर्षे आवास सासवने धोकवडे रहिवासी रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मधील गरीब गरजू विद्यार्थिनींना त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांची शाळेत येण्याची गैर सोय होऊ नये या उद्देशाने सायकलींचे मोफत वाटप करत होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचे मोफत सायकली वाटपाचे कार्य त्यांचे पुत्र क्वासार पदमसी व कन्या शाजान पदमसी यांनी अविरतपणे पुढे सुरू ठेवले आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ रोजी क्वासार पदमसी व शाजान पदमसी यांनी विद्यालयातील दहा गरीब गरजू विद्यार्थीनींना सायकलींचे मोफत वाटप केले.
यामध्ये विद्यालयातील म्हात्रे तनिष्का नितिन [ इ.५ वी ], वाडकर मनवा अजय [ इ.५ वी ], भानसे जिया विवेक [ इ.५ वी ], पाटील वंशिका विनोद [ इ.७ वी ], भगत काव्या सुशांत [ इ. ८ वी अ ], म्हात्रे क्षमिका विनोद [ इ.८ वी अ ], कवळे सलोनी मंगेश [ इ. ८ वी अ ], पंडीत मनस्वी मनोज [ इ.९ वी अ ], दुर्गम राधिका लक्ष्मीराजम [ इ.९ वी अ ], खंदारे पायल रामराव [ इ.९ वी अ ] या गरीब गरजू विद्यायार्थीनींना मोफत सायकलींचा लाभ मिळाला.
सायकली वाटपाच्या कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्रथम क्वासार पदमसी व शाजान पदमसी यांचे विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी यथोचित स्वागत केले.
या कार्यक्रमाप्रसंगी क्वासार पदमसी व शाजान पदमसी यांनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी विद्यालयाच्या व संस्थेच्या वतीने क्वासार पदमसी व शाजान पदमसी यांनी मोफत सायकली वाटप केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सांस्कृतिक समिती प्रमुख अजित नाईक सर यांनी केले.





