भंडारा जिल्ह्यात तुमसर व मोहाडी येथे रोकड जप्त
भरारी पथकाची यशस्वी कामगिरी
भंडारा जिल्ह्यात तुमसर व मोहाडी येथे रोकड जप्त
भरारी पथकाची यशस्वी कामगिरी
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
बिनधास्त न्यूज वृत्तसेवा
तुमसर: भंडारा जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची तयारी अंतिम टप्प्यात असतांना काल प्रचाराच्या तोफा थंड झाल्यावर ‘अर्थ’ स्थांतराने वेग घेतल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास येऊन आज तुमसर शहरात दोन ठिकाणी रोकड प्राप्त झाल्याने रोख रकमेची पाठवणी करणा-या गुप्त उमेदवारांचे धाबे दणालले आहे.
प्राप्त माहितीनुसार तुमसर तालुक्यातील पिटेसुर येथे झायलो गाडी क्र.MH04GD0430 मध्ये रोकड असल्याच्या माहितीवर निवडणुक फिरत्या पथकाने धाड घालून रोख रक्कम जप्त केल्याची अधिकृत माहिती आहे. यात किती रोकड आहे याची माहिती मिळाली नाही. पण ज्याच्याजवळ ही रक्कम मिळाली तो किराणा व भाजी घ्यायला जात असल्याचे सांगितले यावर पथकाला विश्वास बसलेला नाही तरी चौकशी सुरु असून पुढील तपास सुरु आहे.
तसेच तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे गुप्त माहितीच्या आधारावर निवडणुक भरारी पथकाने तपासणी केली असता दोन लाख सत्तावीस हजाराची रोकड एका अज्ञात इसमाच्या गाडीत मिळाली असून भरारी पथकाने तिन ईसमांना सिहोरा पोलीसाच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास तुमसर पोलीस करीत आहे.