Breaking
अहमदनगरकवितागडचिरोलीगोंदियाचंद्रपूरनागपूरनांदेडनाशिकपुणेबीडभंडारामराठवाडामहाराष्ट्रविदर्भ

बुधवारीय काव्यरत्न स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना

0 4 0 9 0 3

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ स्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*‼मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ कविता स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट काव्यरचना*‼
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट नऊ????????????*

*????विषय : मी मतदार????*
*????बुधवार : २०/ नोव्हेंबर /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*मी मतदार*

*घडविण्या देशाचं भविष्य,*
*निवडूया योग्य सरकार…*
*पैशात विकणार नाहीच,*
*आहो जागृत मी मतदार…१*

*मत देताना करा विचार ,*
*पैसा नको हवा रोजगार…*
*हवा शेतीमाल हमी भाव,*
*नको उगा आम्हां उपकार …२*

*सत्ता मोहात हपापलेले,*
*करी पैशाचाच व्यवहार…*
*विकासाच्या नावाखाली चाले,*
*नित खोट्या हमीचा बाजार…३*

*झेंडे देती तुमच्या हातात,*
*देती धोंडे आणि तलवार…*
*गुन्हे होताच दाखल तुम्हां,*
*भविष्याचा होतो बंटाधार…४*

*कुठे सभा कुठे दरबार,*
*गल्ल्याबोळ्यात चाले प्रचार…*
*त्यांच्या खोट्या आमिषाला कुणी,*
*बळी पडू नका मतदार…५*

*देश माझा आणि मी देशाचा,*
*करा देशाचा नित्य विचार…*
*”सुधाकरा” मत देशहिता,*
*द्यावे बनून समजदार…६*

*सुधाकर भगवानजी भुरके आर्य नगर नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️????????〽️????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*

सांगून गेले बाबासाहेब, संविधान शिल्पकार
मी मतदार जागरूक, हा माझा मताधिकार..//

संविधानिक जबाबदारी, मी इथे निभावणार
हक्क म्हणा की कर्तव्य, तेच मी बजावणार..//

सद्सद् विवेकबुद्धीशी, मी असेन इमानदार
राष्ट्रीय हितास लायक, पसंत करेन उमेदवार..//

भूलथापा प्रलोभनाला, बळी नाहीच पडणार
मतदान हा राष्ट्रधर्म, हातून योग्य तेच घडणार.//

अभ्यासू, जिज्ञासू, प्रामाणिक नेता निवडणार
त्याच माध्यमातून, सर्वांचा विकास घडवणार.//

भ्रष्ट, दुष्ट, ढोंग्यांना, आता कायमचे गाडणार
लोकहितवादी, सत्यवादींना, सत्तेत धाडणार.//

बहुमूल्य मतातून , लोकशाहीची वाट धरणार
मतदार हाच खरा राजा, हेच सिद्ध करणार.//

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????〽️????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*

“मी मतदार गावाचा
निवडून देणार उमेदवार ”
“मी उमेदवाराचा आवडता
सुवर्णपारखी मतदार ”

“डॉ आंबेडकरांनी आम्हांस
हक्क दिला मतदानाचा ”
“मी मतदार झालो म्हणून
होणार आमदार जनतेचा ”

“जो जनतेचा कैवारी तो
आमचा खरा उमेदवार ”
“शहाणा, सुशिक्षित तोच
निवडणार आदर्श आमदार ”

“मी मतदार, दान करणार
मी माझे पवित्र मतदान ”
“कारण मला चांगले, वाईट
कोण याचे मिळाले वरदान ”

“जो जनतेचा सेवक तोच
खरा नेता माझ्या हृदयातला ”
“जो माझ्या गोर गरीब
जनतेचा कैवारी मनातला ”

*श्री हणमंत गोरे*
*मुपो :घेरडी, ता :सांगोला, जि :सोलापूर*
*(©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह )*
♾️♾️♾️♾️????????〽️????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*

आज गेली होती मी मतदानाच्या अंगणात
उभे होते पाया पडत..उमेदवार रिंगणात
गेली जरा आत बॅलटवर दिसला चिन्ह हात
चालतात ह्यांचे पाय पण चालत नाही ना हात
पंगू हाताने देशाचा विकास कसा साधणार?
गेलं लक्ष घड्याळात पण मनगट दिसलं बदललेलं..
बदललेल्या मनगटात बळ कुठून येणार?
खाली दिसली बॅट कितीही मारले चौके तरी
दारिद्र्य का दूर होणार?
अंती दिसलं कमळ..पण होऊ लागली मळमळ
चिखलंच बदललेलं दिसलं..तर होईल का भूविकास?
विचार केला मनात.. मी मतदार..
विवेकबुद्धी वापरून निवडेन उमेदवार आज
जो लोकशाहीचा असेल स्वच्छ आरसा खास..

*तारका रुखमोडे अर्जुनी जि. गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????〽️????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*

दवंडी आली कानी
हजर व्हावे मतदान केंद्रावर
मी मतदार मौल्यवान मत देणार

राज्यघटनेचा अटीतटीचा उत्सव
सहभागी व्हावे प्रत्येकाने
आनंदक्षण आपणच जिंकणार

सुज्ञ सजग मी मतदार
योग्य मतदान करणार
नोटांचा बळी ना होणार

जगा आणि जगू द्या
शब्दांना ह्या जागणार
जात -धर्मासाठी अंध ना होणार

हक्क आणि कर्तव्य
नाण्याच्या असती दोन बाजू
संविधान निवडणुकीला मान देणार

कृतीशील बळकट नेतृत्व निवडणार
शहराचे वैभव वाढवणार
भविष्य आपणच बदलणार

मतदान अधिकार ही शक्ती
ब्रह्मास्त्रात्रापेक्षा अधिक ताकदवान
निळीशाई शुभचिन्ह खुलले बोटावर

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????〽️????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*मी मतदार*

मी मतदार या देशाचा
मताधिकार गाजवणार
लोकशाही अधिकाराची
अंमलबजावणी करणार

कल्याणकारी लोकनेता
निवडीचा आहे अधिकार
अमिषाला कोणाच्याही
बळी नाही मी पडणार

देशाचे उज्ज्वल भविष्य
घडविणारा कुणी नेता
देईल मतदान बिलकुल
जो राष्ट्रहिताच्या करीता

पाहून हल्ली वातावरण
सगळेचं कसे हपापलेले
जो तो सत्ता उपभोगीतो
स्वार्थहित तेच साधलेले

बळकट व्हावी लोकशाही
याच आशेवर ठाम आहे
आदर्श लोकशाही माझी
देशाचाचं पंचप्राण आहे

मी जागरूक मतदार हा
प्रत्येकाचा सहभाग आहे
मजबूत पाया उभारणीत
प्रत्येकाचा हातभार आहे

*✍️बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????〽️????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*

सहा मयण्या पयले लेका
स्यायी लावलीस ना बोटाले
मीनं नायी केलं मतदान तवा
मणत माहा दोस्त आला भेटाले

भाऊ तवा लोकसभा होती गा
आता इधानसभा हाहे
तूले का समजन मताची किंमत
तू पक्का बह्याड हाहेस

मी मतदार हाहो लेका
दरवेळ लागतो रांगेत
ते लेकाचे भ्रष्टाचार करून
घोडं धुवून घेते गंगेत

माया गोष्टी आयकुन
हरूसकन लेकाचा सटकला
बोलून सूकला गरा माहा
पाण्याचा एक घुट गिटकला

आता आली तरतरी मले
मी मतदार मून बजावतो हक्क
त्यायनं कबूल केली व्हती दारू
पण माहे ठरलं आता पक्क

माहा सौक माहा पैसा
या चोट्ट्यायचा घेणार नायी
कितीही द्या लेकहो आमीष
माहं मत कोणाले इकणार नायी

*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*© सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????〽️????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*

मतदानाचा हक्क आज मला बजावयाचा आहे
निर्णायक मत माझ्याच तर हातात आहे

महागाई, गुन्हेगारी, अनारोग्य यांनी गाठलाय कळस
सामान्य जनता मात्र यातच मरते रात्र नि दिवस

गरिबांची गरिबी आता वाढतच चाललीय
श्रीमंतांची श्रीमंती मात्र दुप्पट झालीय

मत घेण्यासाठी पैसा आणि पार्ट्यांचं दाखवलं जातं गाजर
निवडून आल्यानंतर सारेच त्यांच्या ताटाखालचं मांजर

पण आता जागृती झाली आणि कळले मला ‘हक्क माझा नाही स्वस्त’
‘एक मत माझं’ बदलून टाकते सत्ता, ताज अन तख्त

कुवत ज्यांची शाहू-फुले- आंबेडकरांचा विचार जोपासण्याची
समता, न्याय, बंधुत्व स्थापनेसाठी निवड अशाच नेत्याची करायची

म्हणूनच तर ‘मी मतदार’ हक्क माझा आज बजावणार
तुम्हालाही मतदान करण्याचे आवाहन मी करणार

कारण प्रभावी पवित्र प्रभावी शस्त्र आहे मतदान
आपल्या योग्य विचारानेच होणार आहे भारत देश महान

*सौ अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????〽️????????♾️♾️♾️♾️
*मी मतदार*

भ्रष्ट झाला पुढारी इथला
भ्रष्ट झाला समाज
मतांसाठी वाटती पैसा
विकतो माणूस मत आज

राजा असावा शिवाजी सम
प्रजाहितदक्ष कल्याणकारी
आज पुढारी येई खुर्चीवर
स्वयं कल्याण,जन दारोदारी

मी मतदार मी देणार मत
त्यास जो सरस असेल
निवडून आल्यानंतरही
जो जनतेचा पाईक ठरेल

जात पात धर्म पक्ष
याहून परे योग्य नेतृत्व
जाणूनी मारेन ठप्पा
जयाचे सुयोग्य कर्तुत्व

होईल का साकार स्वप्न
सुजलाम सुफलाम भारताचे
कि पडतील पुतळे, नष्ट जंगले
बांधतील बंगले स्वार्थाचे

बजावला हक्क मतदानाचा
शिक्का प्रत्येकाच्या बोटावर
घडवेल बदल लोकशाही
विश्वास असावा मतावर

*कु.संगिता रामटेके/भोवते*
*साकोली भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????〽️????????♾️♾️♾️♾️

➖➖➖➖????????????➖➖➖➖

*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन* ????
*सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*????

➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे