Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदादरा नगर हवेलीदेश-विदेशनवी दिल्लीनागपूरपरीक्षण लेखपश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगमराठवाडामहाराष्ट्रराजकियसंपादकीयसाहित्यगंध

“सत्तेच्या सारीपाटावरील भागीदारी”, अर्थात राजकीय लढाई: प्रशांत ठाकरे

'शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धे'चे काव्यपरीक्षण

0 4 8 2 8 2

“सत्तेच्या सारीपाटावरील भागीदारी”, अर्थात राजकीय लढाई: प्रशांत ठाकरे

‘शनिवारीय काव्यस्तंभ स्पर्धे’चे काव्यपरीक्षण

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजलेले आहेत. कुणाला नगरसेवक, तर कुणाला नगराध्यक्ष होण्याचं दिवसा स्वप्न पडत आहे. हरकत नाही ही लोकशाही आहे, लोकांच्या मनात असेल तर तुमचं ते स्वप्न…दिवसाचं का असेना…पूर्ण होईलच. पण? एक गोष्ट मी प्रकर्षाने पाहिली ती म्हणजे लोकांनी केलेली भागीदारी. सत्तेच्या सारीपाटावर स्वतःच्या वजीराला पुढे नेताना त्याला जिंकवण्यासाठी कुठे भावा-भावांमध्ये, कुठे सासू-सासऱ्यांमध्ये, कुठे बाप- लेकामध्ये तर कुठे, जावा – जावांमध्ये राजकीय लढाई पहायला मिळत आहे. बहुतांशी ठिकाणी तर मोठ्या राजकीय पुढार्‍यांनी आपल्या धर्मपत्नींनाच या सत्तेच्या भागीदारीत उतरवलेलं आहे. ही वैचारिक लढाई आहे ? की सत्तेसाठी केलेली स्वार्थी भागीदारी आहे?

कारण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राने अशा अनेक अनैसर्गिक भागीदाऱ्या सोसल्या आहेत. राजकीय पक्ष हे एका विशिष्ट विचारधारेवर चालतात हे मी अभ्यासलेले आहे. मग प्रश्न निर्माण होतो की, राजकीय तत्त्वांचे काय? एकाच घरात राहणाऱ्या दोन भावांमध्ये वैचारिक एवढा मनभेद, मतभेद असावा की दोन्ही वेगवेगळा झेंडा खांद्यावर घेऊन सत्तेची भागीदारी घरातच कशी राहील हा विचार तर करत नसतील ना ? ही शंका माझ्या मनात निर्माण होते. तसे आपण स्वतःला समजवण्यात नेहमीच अग्रेसर असतो. कारण, आपण ज्या विचारधारेवर विश्वास ठेवून एखाद्याला निवडून देतो, तो नंतर कितीही कोलांटउड्या मारो, आपण निमूटपणे सहनच करतो; तेव्हा ही भागीदारी कशीही असो, करूया सहन…नाहीतरी मराठी माणूस सहनशील आहेच.

आज ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ स्पर्धेसाठी ‘मराठीचे शिलेदार’ समूहाचे सर्वेसर्वा आदरणीय राहुल सरांनी ‘भागीदारी’ हा राजकीय पटलावरचा विषय दिला. अर्थात विषयाला अनुसरून दर्जेदार कविता सर्वच समूहात पहावयास मिळाल्यात. कुणी कौटुंबिक भागीदारी रेखाटली. कुणी व्यावसायिक भागीदारीला अधोरेखित केलं. कुणी आपल्या जीवनसाथीरुपी भागीदाराच्या आठवणींना उजाळा दिला. मला असे वाटते….’कविता ही प्रत्येक हृदयाचा आवाज असतो’. जिथे शब्द खरे असतात, तिथे कविता आपोआप आत्मीय होते. तेव्हा आत्मियता जोपासूयात…!! आजच्या या आगळ्यावेगळ्या विषयाला आपण सर्वांनी न्याय दिला, तेव्हा सर्वांचे मनापासून खूप खूप अभिनंदन…! लिहीत राहूयात….सातत्य ठेवूयात…मनस्वी धन्यवाद.

प्रशांत दत्तात्रय ठाकरे
सिलवासा, दादरा नगर हवेली
मुख्य परीक्षक,सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे