0
4
0
8
9
0
आम्ही कविता लिहितो
अंतरीची गाथा कधी
कधी आनंदाचे क्षण
शब्दांतूनी ती उतरता
साकार होतसे कवन
कधी प्रीत वेडी तरल
उसासे कधी ते बेभान
अश्रूंचाही पाट थोपवी
असे सामर्थ्य कवितेत
बोलती सारे प्रजाजन
वेडे पीर असती कवी
कुणास कसे सांगावे ?
या वेडेपणातच मिळे
आम्हा सुखाची हमी
होय, सुखाची ही हमी
अवतरे शब्दाशब्दांतून
म्हणूनच रसिकजनहो
आम्ही कविता लिहितो
आम्ही कविता लिहितो
वैशाली उत्तम अंड्रस्कर, चंद्रपूर
=================
0
4
0
8
9
0





