Breaking
ई-पेपरक्रिडा व मनोरंजनछत्रपती संभाजी नगरनागपूरपरभणीब्रेकिंगमराठवाडा

‘आनंदाची गाणी आनंद तरंग’; जि.प.प्रा.शा.रत्नापूर येथे रंगला सांस्कृतिक महोत्सव

जिल्हा प्रतिनिधी परभणी

0 4 0 9 0 3

‘आनंदाची गाणी आनंद तरंग’; जि.प.प्रा.शा.रत्नापूर येथे रंगला सांस्कृतिक महोत्सव

जिल्हा प्रतिनिधी परभणी

परभणी: दिनांक 4 मार्च 2025 वार मंगळवार रोजी रात्री जि.प. प्रा. शा. रत्नापूर शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम धुमधडाक्यात संपन्न झाला.

सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन मानवतचे नायब तहसीलदार मा. खिल्लारे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून मा.संतोष आंबेगावकर माजी उपसभापती पंचायत समिती मानवत, मा. कृष्णा परमेश्वर शिंदे मार्केट कमिटी संचालक तथा सरपंच हतलवाडी, मा.ओम मुळे साहेब, केंद्रप्रमुख केकरजवळा, मा. रमेश तांबुळे सर उच्च श्रेणी मुख्याध्यापक रेनाखळी तसेच मा. चक्रधरजी राजे सरपंच रत्नापूर, सौ.सीमाताई ओमप्रकाश चिलवंत शा.व्य.स.अध्यक्ष जि. प.प्रा.शा.रत्नापूर, श्रीमती रत्नमालाबाई कदम उपसरपंच रत्नापूर, मा.उत्तमराव नंदनवरे पोलीस पाटील रत्नापूर, सौ. वर्षा बाबासाहेब कमाले सदस्या शा.व्य.स आणि शाळेचे मुख्याध्यापक मा.अशोकभाऊ सरवदे सर हे उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व महामानवांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यानंतर मुख्याध्यापक अशोकभाऊ सरवदे सरांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले. जिजाऊ वंदनेने सांस्कृतिक कार्यक्रमाची शानदार सुरुवात करण्यात झाली.

सांस्कृतिक कार्यक्रमात विविध लोकगीतांच्या माध्यमातून शिक्षणाचे महत्व, पाणी बचत काळाची गरज, शेतकऱ्यांची व्यथा व उपाय, वृक्षारोपण, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वच्छतेचे महत्व, ऐतिहासिक वारसांचे जतन, महामानवांच्या कार्याची ओळख,वाचनाचे महत्त्व, अनिष्ट सामाजिक प्रथा, पारंपारिक नृत्याची ओळख इत्यादी मूल्यांची रुजवण करण्याबरोबरच निखळ मनोरंजन आणि त्यातून विद्यार्थ्यांची जडणघडण सर्वोत्तम व्हावी म्हणून सुप्त गुणांना वाव देण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमात जवळपास 22 गाणे सादर करण्यात आले. गावातील सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

मा. नायब तहसीलदार साहेबांनी शाळेसाठी महामानवांच्या 100 पुस्तकांचा संच देण्याचे जाहीर केले. गावचे सरपंच चक्रधर राजे यांनी शाळेला पाच फॅन व शंभर रुपये प्रमाणे 2200 रुपये दिले. तसेच शाळेतील शिक्षक संग्राम कुमठेकर सरांनी प्रत्येक गाण्यातील उत्कृष्ट कलाकार निवडून 2200 रुपये दिले.1111 रू दिल्यामुळे निवडक चार गाण्यांचा वन्स मोअर करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमातील सर्व गाण्यांची पूर्वतयारी श्रीमती आम्रपाली मोटे मॅडम व श्रीमती स्वप्नाली आवले मॅडम यांनी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संग्राम कुमठेकर सरांनी केले.

सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मंडप डेकोरेशन व साऊंड सिस्टिमची विनामूल्य सोय करून देणारे मा. राजूभाऊ कदम व मा. रमेशभाऊ साळवे यांचा शाळेच्या वतीने सरवदे सरांनी विशेष सत्कार केला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गावकऱ्यांच्या वतीने सरपंच, उपसरपंच व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, पोलीस पाटील यांनी शाळेतील सर्व शिक्षकांचा यथोचित सत्कार केला. ” न भूतो न भविष्यती ” असा रंगतदार कार्यक्रम झाला म्हणून गावकऱ्यांनी सर्व शिक्षकांचे तोंडभरून कौतुक केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 0 9 0 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे